मराठी बातम्या  /  धर्म  /  Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : छत्रपती संभाजी महाराजांविषयीच्या 'या' खास गोष्टी सर्वांना माहीत असायलाच हव्यात!

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : छत्रपती संभाजी महाराजांविषयीच्या 'या' खास गोष्टी सर्वांना माहीत असायलाच हव्यात!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 14, 2024 09:22 AM IST

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची तारखेनुसार साजरी होणारी जयंती असते. संभाजी राजेंची जयंती वर्षातून दोनदा साजरी होते. कारण पंचांग मानणारे काही लोक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तिथीनुसारही साजरी करतात.

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : छत्रपती संभाजी राजेंबाबत या खास गोष्टी सर्वांना माहीत असायलाच हव्यात!
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : छत्रपती संभाजी राजेंबाबत या खास गोष्टी सर्वांना माहीत असायलाच हव्यात!

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनी वडिलांच्या निधनानंतर मराठा साम्राज्य सांभाळले. संभाजी राजेंनी १६८१ ते १६८९ अशी ९ वर्षे त्यांनी दुसरे छत्रपती म्हणून राज्य केले. १४ मे ही त्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

ट्रेंडिंग न्यूज

१४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची तारखेनुसार साजरी होणारी जयंती असते. संभाजी राजेंची जयंती वर्षातून दोनदा साजरी होते. कारण त्यांच्या तारखेवरुन वाद असल्याने आणि पंचांग मानणारे काही लोक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तिथीनुसारही साजरी करतात. 

संभाजी राजेंच्या जयंती दिवशी विविध कर्यक्रमांचे आयोजन केले जाते. छत्रपतींच्या शौर्याचे पोवाडे गायले जातात. गड-किल्ल्यांवर उत्सवांचे आयोजन होते. इतिहासाच्या पानापानांतून महाराजांच्या शौर्याचे धडे घेतले जातात.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टींवर एक नजर टाकूया.

  • संभाजीराजे यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या पोटी किल्ले पुरंदर येथे झाला. मात्र, पुढील अवघ्या दोन वर्षांमध्ये सईबाई यांचे निधन झाले. यानंतर संभाजी राजेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, चिकित्सपणा आणि राज्यकारभाराचे सर्व गुण त्यांनी आत्मसात केले. 
  • ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अतिशय देखणे आणि शूर होते. ते अनेक भाषांत विाविशारद व धुरंदर राजकारणी होते.
  • राजकारणातील बारकावे त्यांनी आत्मसात केले होते. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहानसहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले. संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता.

Astro Upay : पायात काळा धागा का बांधतात, याचा फायदा काय? जाणून घ्या

  • वयाच्या नवव्या वर्षी संभाजी महाराजांना अंबरचा राजा जयसिंग यांच्याकडे राजकीय बंधक म्हणून राहण्यासाठी पाठवण्यात आले होते.
  • संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत, मराठा राज्य आणि मुघल साम्राज्यामध्ये अनेक लढाया झाल्या. मराठा राज्याला आकार देण्यासाठी ते आवश्यक होते आणि त्यांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेसाठी ते आदरणीय आहेत.
  • संभाजी महाराज मराठी व्यतिरिक्त ते इतर भाषाही बोलत होते.
  • संभाजीराजांनी राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. याप्राणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा उमटलेला आढळतो. अशा या शूर राजाचे ११ मार्च १६८९ रोजी निधन झाले.
  • संभाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ राजाराम राजे गादीवर बसले.

हेही वाचा: छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा द्या! मित्रमैत्रिणींना 'हे' खास संदेश पाठवा!

WhatsApp channel