छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे फाल्गुन अमावस्येला निधन झाल्याचं सांगितलं जातं. तारखेनुसार ११ मार्च आणि तिथी नुसार शिवप्रेमी संभाजी महाराजांची पुण्यतिथी फाल्गून अमावस्येला पाळतात. आज ८ एप्रिलला फाल्गुन अमावस्या असल्याने आजच्या दिवशी संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे.
संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक किंवा धर्मवीर असाही केला जातो.संभाजी राजाचं १६ भाषांवर प्रभुत्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
ज्यांचं मस्तक फक्त मातृभुमीसाठी झुकतं,
त्यांना कुठंच मस्तक झुकवावे लागत नाही
…
कोंढाण्यासाठी तानाजी गेला
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला…
महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला
संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमीत्त त्यांना त्रिवार अभिवादन
…
कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन करणे महत्वाचे आहे,
तुम्ही फक्त नियोजन करून तुमचे लक्ष्य साध्य करू शकता
…
शुन्यातून स्वराज्य निर्माण करणे सहज शक्य तर नव्हतच,
पण त्याहून कठीण होत ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं.
…
जगणारे ते मावळे होते,
जगवणारा तो महाराष्ट्र होता,
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून,
जनतेकडे मायेने हात फिरवणारे ते आपले संभाजी राजे होते.
…
पराक्रमी योद्धा,
एकही युद्ध न हरणारे स्वराज्य रक्षक,
ज्वलंत-कीर्तिमंत असे धर्मवीर शिवपुत्र,
शिवबाचा छावा व मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज.
…
प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
दुश्मनाचे सदा परतून तूच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तूच घेतला जन्म सईराणीच्या पोटी,
हे संभाजी राजा प्रणाम तुजला जन्माोजन्मी कोट्यान कोटी
…
मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर ।
फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर ।।
दुर्दात दाहक ज्वलंत समाज व्हावा ।
म्हणुनी उरात धरुया शिवसिंहछावा।
महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !