मराठी बातम्या  /  धर्म  /  Char Dham Yatra: अक्षय्य तृतीयेला सुरू होतेय चार धाम यात्रा! कसे आणि कुठे करावे ऑनलाईन रजिस्ट्रेशन?

Char Dham Yatra: अक्षय्य तृतीयेला सुरू होतेय चार धाम यात्रा! कसे आणि कुठे करावे ऑनलाईन रजिस्ट्रेशन?

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 10, 2024 12:03 PM IST

Char Dham Yatra 2024:आज १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गंगोत्री,यमुनोत्री आणि केदारनाथ या चारपैकी तीन देवस्थानांच्या उद्घाटनाने होईल.

अक्षय्य तृतीयेला सुरू होतेय चार धाम यात्रा! कसे आणि कुठे करावे ऑनलाईन रजिस्ट्रेशन?
अक्षय्य तृतीयेला सुरू होतेय चार धाम यात्रा! कसे आणि कुठे करावे ऑनलाईन रजिस्ट्रेशन?

Char Dham Yatra 2024: गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या उत्तराखंडमधील चार पवित्र तीर्थक्षेत्राची यात्रा 'चार धाम यात्रा' म्हणून ओळखली जाते. गेल्या सहा महिन्यांपासून हिमवर्षामुळे बंद असलेल्या या पवित्र ठिकाणाचे दर्शन आज भक्तांसाठी खुले होणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आज या तीर्थक्षेत्रासंबंधित अधिकाऱ्यांनी ही शुभ वार्ता दिली आहे. आजपासून चार धाम यात्रेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वार्षिक चार धाम यात्रेची सुरुवात आज १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ या चारपैकी तीन देवस्थानांच्या उद्घाटनाने होईल. येत्या १२ मे रोजी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे लोकांसाठी खुले होतील. चार धाम यात्रा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र यात्रा समजली जाते. दरवर्षी लाखो भाविक या पवित्र तीर्थस्थानांना भेट देतात. मात्र, हिवाळ्यात हिमवृष्टीमुळे सुमारे सहा महिने हे तीर्थस्थान यात्रेसाठी बंद असतात. चार धाम यात्रा साधारणपणे एप्रिल-मे ते ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत सुरू करण्यात येते.

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला तुमच्या राशीनुसार खरेदी करा या वस्तू, देवी लक्ष्मी छप्परफाड पैसा देईल

अध्यात्मिक मान्यतेनुसार, चार धाम यात्रा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सुरू केली जाते. म्हणून ही तीर्थयात्रा यमुनोत्रीपासून सुरू होऊन गंगोत्रीकडे जाते. नंतर केदारनाथपर्यंत पोहोचते आणि शेवटी बद्रीनाथ येथे समाप्त होते. आयुष्यात एकदा तरी चार धाम यात्रा करण्याचा योग जुळून यावा, अशी हिंदू धर्मात प्रत्येक भक्ताची अपेक्षा असते. त्यानुसार हे भाविक प्रयत्नसुद्धा करत असतात.

'चार धाम यात्रे'साठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी?

चार धाम यात्रेसाठी भाविक उत्तराखंड पर्यटन विभागाच्या  registrationandtouristcare.uk.gov.in या वेबसाईटवर  आपली ऑनलाइन नोंदणी करू शकतात. त्यासोबतच केदारनाथची मुख्य वेबसाईट badrinathkedarnathgov.in या वेबसाईटवरसुद्धा भाविक नोंदणी करु शकतात. तसेच, उत्तराखंड टुरिझम अॅपच्या माध्यमातूनसुद्धा नोंदणी करणे शक्य आहे.

Akshaya Tritiya Wishes : कुटुंबातील आनंद व उत्साह वाढवण्यासाठी द्या अक्षय्य तृतीयेला या खास शुभेच्छा

वेबसाईटवर पद्धतशीर नोंदणी करण्याची प्रक्रिया:

१) registrationandtouristcare.uk.gov.in या अधिकृत चार धाम यात्रा नोंदणी वेबसाईटला भेट द्या.

२) नोंदणी किंवा लॉगिन बटणवर क्लिक करा.

३) नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी इत्यादीसह आवश्यक तपशील भरा.

४) नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवलेला OTP टाकून आपली नोंदणी पूर्ण करा.

५) त्यानंतर, एक नवीन डॅशबोर्ड दिसेल, जिथे प्रत्येक व्यक्तीच्या प्रवासाच्या तारखा, पर्यटकांची संख्या, भेट देण्यासाठी नोंदणी केलेली तीर्थस्थळे अशा गोष्टी नमूद करता येतील.

६) नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक नोंदणी क्रमांक पाठवला जाईल. त्यांनंतर पुढे चार धाम यात्रेसाठी नोंदणी सर्टिफिकेट डाऊनलोड करता येईल.

WhatsApp channel

विभाग