Champa Shashti Significance In Marathi : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्हारी यांसारख्या इतर नावांनीही ओळखले जातात, जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे.
मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते, ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते. चला, २०२४ मध्ये चंपाषष्ठीची तारीख, वेळ आणि महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.
उदया तिथीनुसार ७ डिसेंबर, शनिवार रोजी चंपा षष्ठी साजरी होणार आहे.
षष्ठी तिथी ६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी सुरू होईल.
षष्ठी तिथी ८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी समाप्त होईल.
जेजुरी येथील खंडोबा मंदिरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो. यानिमित्ताने खंडोबा देवाला हळद, फळे, भाजीपाला अर्पण केला जातो. येथे जत्राही भरवली जाते.
मार्गशीर्ष शुद्ध पंचमी तिन्ही सांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे व देव मुटके, पुरणाचे ५ दिवे करून शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला ओवळावे. शक्य नसल्यास तेलाने वाती प्रज्वलित कराव्या व औक्षण करावे.
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी चंपाषष्ठी देवघरातील सर्व देवांना पंचामृत अभिषेक करावा. चाफ्याची फुले देवाला अर्पण करावी. घटावर फुलांची माळ लावावी. दिवा प्रज्वलित करून देवाला ओवाळावे. पुरणाचा नैवेद्य त्यासोबत बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, नवा कांदा, दहीभात, लिंबू, गाजर इत्यादी नैवेद्य दाखवावा.
चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबाती कुळाचा कुळाचार असतो, त्यामुळे घरोघरी तळी उचलतात. ताम्हणामध्ये भंडारा पसरून त्यावर ५ विड्याची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे व मधोमध भंडारा खोबरे वाटी ठेवावी. ५ मुले किंवा पुरुषांना बोलावून घट उचलावा व ३ वेळा येळकोट येळकोट म्हणून तळी उचलावी. त्यानंतर तळी भंडारा करावा व दिवटी बुधले प्रज्वलित करावे.
या दिवशी मार्तंड भगवान आणि सूर्याची विशेष पूजा केली जाते. सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार केला जातो. यावेळी शिवाचेही ध्यान केले जाते आणि शिवलिंगाची पूजा केली जाते, ज्यामध्ये दूध आणि गंगाजल अर्पण केले जाते. देवाला चंपा फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. या दिवशी जमिनीवर झोपण्याचेही महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेली पूजा आणि व्रत पापांचा नाश करते, समस्या दूर करते आणि जीवनात सुख-शांती आणते. चंपाषष्ठीची संबंधित विविध मतप्रवाह प्रचलित आहेत.
संबंधित बातम्या