Chaitra Navratri Wishes : दुर्गेच्या नव रूपाचं पूजन करूया, चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा देऊया-chaitra navratri 2024 wishes in marathi post captions quotes status heart touching messages shubhechha ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Chaitra Navratri Wishes : दुर्गेच्या नव रूपाचं पूजन करूया, चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा देऊया

Chaitra Navratri Wishes : दुर्गेच्या नव रूपाचं पूजन करूया, चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा देऊया

Apr 09, 2024 08:42 AM IST

Chaitra Navratri 2024 Wishes : आज ९ एप्रिल २०२४ पासून चैत्र मासारंभ होत आहे. मराठी नववर्ष प्रारंभासोबत गुढीपाडवा सण आजच्या दिवशी साजरा केला जातो, तसेच आजपासून चैत्र नवरात्रारंभ होत आहे. नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रूपाचं पूजन केलं जातं. नवरात्रारंभानिमीत्त द्या या खास शुभेच्छा.

चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा
चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा

महाराष्ट्रात शारदीय नवरात्री इतकेच महत्व वासंतिक नवरात्र किंवा चैत्र नवरात्रीमध्ये असते. चैत्र शुक्ल प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसांत ती साजरी केली जाते. यंदा चैत्र नवरात्र ९ एप्रिल पासून सुरू होणार असून १७ एप्रिलला समाप्त होणार आहे. या नऊ रात्री नऊ दिवसांच्या काळात दुर्गेच्या नऊ रूपाचं पूजन करून सण साजरा करण्याची पद्धत आहे. चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस हा गुढी पाडवा असल्याने हिंदू धर्मिय या दिवशी नव्या वर्षाची सुरूवात आनंदमय वातावरणामध्ये व्हावी म्हणून प्रार्थना करतात.

शारदीय नवरात्री प्रमाणे चैत्र नवरात्र देखील नऊ दिवस साजरी करताना काही घरांमध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याची रीत आहे. यावेळेस नऊ विविध धान्यांची बीयाणं रूजवली जातात आणि दशमीच्या दिवशी विसर्जन करतात. महाराष्ट्रात या काळात चैत्रगौर देखील साजरा केला जातो.

तुमच्या अडचणी या वर्षी संपून नववर्ष प्रारंभ होवो अशी प्रार्थना चैत्र नवरात्री दरम्यान देवीसमोर करा आणि आपल्या आप्तस्वकीयांना या नवरात्रीच्या भरभरून शुभेच्छा द्या.

चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके

शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते

चैत्र नवरात्र च्या मंगलमय शुभेच्छा

दुर्गेच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या

सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळो,

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला

नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता,

नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः

शुभ चैत्र नवरात्री

तुम्हाला खूप आनंदी, समृद्ध आणि

आरोग्यदायी आयुष्य लाभो

हीच दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना

नववर्ष व चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा

तुमचे आयुष्य सदैव आनंदी राहू दे

तुमच्या स्वप्नांना नवी भरारी मिळू दे

नवरात्रीच्या या पावन प्रसंगी

आई जगदंबेचा कृपाशिर्वाद तुम्हांस मिळू दे

चैत्र नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा

दुर्गा माता आली तुमच्या दारी करुनी सोळा श्रृंगार

तुमची जीवनात कधीही न होवो हार

सदैव सुखात राहो तुमचा परिवार

चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचे आयुष्य सदैव आनंदी राहू दे

तुमच्या स्वप्नांना नवी भरारी मिळू दे

नवरात्रीच्या या पावन प्रसंगी

आई जगदंबेचा कृपाशिर्वाद तुम्हांस मिळू दे

चैत्र नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा

हिंदू भाविक नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसर्‍या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसर्‍या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कात्यायनी, सातव्या दिवशी कालरात्रि, आठव्या दिवशी महागौरी आणि नवव्या दिवशी सिद्धिदात्रि देवीच्या रूपाची आराधना केली जाते. चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच राम नवमी या दिवशी नवरात्र समाप्त होईल.

Whats_app_banner
विभाग