हिंदू धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत पवित्र मानला जातो. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भक्त उपवास करतात आणि तिची दुर्गा देवीची विधीवत पूजा करतात. याशिवाय नवरात्रीचे हे पवित्र दिवस शुभ कार्यासाठीही खूप चांगले मानले जातात. या दिवसात अनेक शुभ कार्ये केली जातात.
नवरात्रीच्या ९ दिवसांत दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. भक्त घरोघरी घट स्थापना करतात. अशा परिस्थितीत या वर्षी चैत्र नवरात्र कधी सुरू होत आहे आणि घट स्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे? हे जाणून घेऊया.
चैत्र मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. या वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी ८ एप्रिल रोजी रात्री ११.५० वाजता सुरू होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ एप्रिल रोजी रात्री ०८:३० वाजता संपेल. हिंदू धर्मात उदय तिथी मानली जाते, म्हणून घटस्थापना ९ एप्रिल होणार आहे.
घटस्थापनेची वेळ ९ एप्रिल रोजी सकाळी ०६:०२ ते १०:१६ पर्यंत आहे. याशिवाय अभिजीत मुहूर्त ११:५७ ते दुपारी १२:४८ पर्यंत आहे. या दोन्ही शुभकाळात घटस्थापना करू शकता.
चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदा तिथीला सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग तयार होत आहेत. या दिवशी सकाळी ७.३२ वाजेपासून अमृत आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. हे दोन्ही योग संध्याकाळी ५:०६ पर्यंत राहतील.
नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे. पाट किंवा चौरंगवर स्वस्तिक चिन्ह बनवा. त्यानंतर चंदन आणि अक्षता यांनी तिलक लावून तेथे मातेची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. यानंतर विधीनुसार दूर्गादेवीची पूजा करा.
संबंधित बातम्या