Chaitra Kalashtami 2023 : भगवान शिवाचं रौद्र रूप म्हणजे कालभैरव, १३ तारखेला होणार कालाष्टमी साजरी
Kalbhairav Kalashtami : कालाष्टमीच्या दिवशी राहू आणि केतूची पीडा मागे लागली असल्यास कालभैरवाची पूजा करावी. कालभैरव हे भगवान शंकराचं रौद्र रूप आहे.
येत्या १३ एप्रिल २०२३ रोजी म्हणजेच गुरूवारी मासिक कालाष्टमी साजरी केली जाईल. ही कालाष्टमी चैत्र महिन्यातली असल्याने याला चैत्र कालाष्टमी असंही ओळखलं जाईल. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी कालाष्टमी साजरी केली जाते.महादेवाचे एक रौद्र रूप म्हणजेच कालभैरव मानले जातात. मान्यतेनुसार शनी आणि राहूच्या दशेपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव यांची पूजा केली जाते.
ट्रेंडिंग न्यूज
कालभैरवाची पूजा म्हणजे कोणत्याही गोष्टीबाबत भीती वाटत असेल तर त्यापासून भैरव म्हणजे त्या भीतीपासून रक्षा करणारा असा त्याचा अर्थ होतो. या दिवशी ऊॅं कालभैलवाय नम: चा जप अवश्य करावा. तुमच्यावर शनि आणि राहू यांची दशा असेल तर कालभैरवाचं स्मरण करावं.
वर्षात होतात १२ कालाष्टमी
दर महिन्याला एक कालाष्टमी याप्रमाणे वर्षभरात १२ कालाष्टमी पाहायला मिळतात. हा दिवस भगवान भैरवनाथाला समर्पित आहे. या दिवशी भैरवनाथाची पूजा आणि उपवास केले जातात. चंद्र महिन्यातल्या कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी हिंदू भाविक भगवान भैरवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करतात.
वैशाख कालाष्टमी व्रत २०२३ तिथी मुहूर्त
पंचांगानुसार, यावेळी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी गुरुवार १३ एप्रिल रोजी पहाटे ०३.४३ वाजता सुरू होत आहे. ही तिथी १४ एप्रिल रोजी पहाटे ०१.३३ वाजता संपत आहे. काल भैरवाची निशिता मुहूर्तावर पूजा केली जाते, म्हणून अष्टमी तिथीचा निशिता मुहूर्त १३ एप्रिलला आहे. अशा परिस्थितीत १३ एप्रिलला चैत्र मासिक कालाष्टमी आहे.