सध्याच्या जगात एक चांगल्या पगाराची नोकरी असावी असे प्रत्येकालाच वाटत असते. रोज उठून कामावर जाण्याची प्रेरणा असते ती महिन्याअखेरीस मिळणारा ‘पगार’! कारण पैसा असेल तरच आपण आपल्या सगळ्या गरजा भागवू शकतो. काही लोक याबाबतीत फारच नशीबवान असतात. मात्र काही लोक याबाबतीत कमनशिबी असतात. अनेकांना नोकरी तर मिळते मात्र त्यात कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली दिसून येत नाही. प्रचंड मेहनत करुनही कामात मनासारखे यश मिळत नाही. वरिष्ठ सतत नाखूष असतात. याचा परिणाम थेट तुमच्या पदोन्नती आणि पगारवाढीवर होतो. अशावेळी नेमकं काय करावं याबाबत ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.
वैदिक शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीला प्रचंड प्रयत्न करुन आणि मेहनत करुनसुद्धा यश मिळत नसेल, तर त्यामागे निश्चितच ज्योतिषीय कारण असू शकते. अशावेळी एखाद्या ज्योतिषांचा सल्ला घेऊन ज्योतिषीय उपाय करणे गरजेचे असते. ज्योतिषशास्त्रात नोकरीत बढती आणि पगारवाढीसाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबाबतच आपण जाणून घेणार आहोत.
ज्योतिष शास्त्रानुसार नोकरीत वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी आणि नोकरीत बढती मिळवण्यासाठी सोमवारी काळे तीळ एका पांढऱ्या कपड्यात बांधून ठेवावे आणि नंतर ते तीळ काली मातेला अर्पण करावे. यासोबतच कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळ्या रंगाची घोंगडी दान करावी. असे केल्याने वरिष्ठांसोबत तुमचे संबंध सुधारण्यास मदत होते. शिवाय तुम्हाला पगारवाढ मिळते.
नोकरीत चांगल्या प्रमोशनसाठी तुम्ही दररोज पक्ष्यांना सात प्रकारची धान्ये (तीळ, केडव, मूग, धान, जव, गहू आणि हरभरा) अवश्य खाऊ घाला. या धान्यांमध्ये ज्वारी, मका, तांदूळ इत्यादींचाही समावेश तुम्ही करु शकता. परंतु आपल्या घराच्या टेरेसवर अथवा कौलांवर हे धान्य ठेऊ नका. शिवाय दर गुरुवारी गरीब आणि गरजू लोकांना पिवळ्या रंगाची फळे किंवा कपडे अशा पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा. असे केल्याने प्रमोशन तर होतेच शिवाय करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी देखील उपलब्ध होतात.
तसेच नोकरीत बढती मिळवण्यासाठी सोमवारच्या दिवशी महादेव मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्या. शिवाय गरजूंना तांदूळ दान करा. याशिवाय गौमातेला रविवारच्या दिवशी गूळ आणि गहू खाऊ घाला. असे केल्याने तुम्हाला वरिष्ठांची मर्जी प्राप्त होते. आणि नोकरीत मनासारखे यश मिळायला सुरुवात होते.
संबंधित बातम्या