जर तुम्हाला भगवान शंकराला प्रसन्न करायचे असेल तर यासाठी प्रत्येक महिन्यातील त्रयोदशीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव कैलास पर्वतावर प्रसन्न होऊन नृत्य करतात, त्यामुळे या वेळी त्यांची पूजा करणाऱ्यांच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात.
ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी बुधवारी (१९ जून) येत असल्याने बुद्ध प्रदोष व्रताचा योगायोग आहे. करिअरमध्ये प्रगती, धनप्राप्ती आणि संतती सुखासाठी बुद्ध प्रदोष व्रत सर्वोत्तम मानले जाते. ज्येष्ठ महिन्यातील बुद्ध प्रदोष व्रताची तिथी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या.
ज्येष्ठ महिन्यातील बुध प्रदोष व्रत १९ जून २०२४ रोजी आहे. या दिवशी शिवलिंगाचा अभिषेक केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. वैवाहिक जीवनात शांतता नांदते.
ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी बुधवार, १९ जून रोजी सकाळी ७.२८ वाजता सुरू होईल. गुरुवार, 20 जून रोजी सकाळी 07:49 वाजता समाप्त होईल.
पूजा मुहूर्त - सायंकाळी ०७.२२ - रात्री ०९.२२ वाजेपर्यंत
प्रदोष काळात त्रयोदशी तिथी येते त्या दिवशी प्रदोष व्रत केले जाते. प्रदोष काल सूर्यास्तापासून सुरू होतो. प्रदोष व्रतामध्ये भगवान शंकराची नेहमी संध्याकाळी पूजा करण्याचा नियम आहे.
या दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान शंकराची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात आणि त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी महादेवाची पूजा केल्याने पापांचे प्रायश्चित्त होते आणि सर्व संकटे दूर होतात. या व्रताचे महत्त्व भगवान शिवानेच माता सतीला सांगितले होते.
संबंधित बातम्या