बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बौद्ध यांचा जन्म आणि निर्वाण दिन वैशाख पौर्णिमेदिवशी झालं असल्याने या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. यंदा बुद्धपौर्णिमा २३ मे रोजी आहे. बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांची जयंती म्हणून साजरी केली जाते, भगवान गौतम बुद्ध यांना बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जाते.
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. त्याला दिव्य ज्ञान, बुधत्त्व किंवा निर्वाण असेही म्हटले जाते. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सामान्य सिद्धार्थ गौतम यांची ओळख ‘बुद्ध’ अशी झाली. जगभरात बुद्ध पौर्णिमा हा सण देशातील आणि जगभरातील बौद्धांद्वारे साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा प्रसंग आहे, ज्याला "बुद्ध जयंती" असेही म्हणतात.
बुद्धं शरणं गच्छामि।
धम्मं शरणं गच्छामि।
संघं शरणं गच्छामि।
बुद्धं शरणं गच्छामि।
…
अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे,
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे,
विश्र्व वंदनीय गौतम बुद्ध,
यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
…
भगवान बुद्ध तुम्हाला प्रेम, शांती आणि
सत्याच्या मार्गावर प्रकाश देतील.
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
…
बुद्ध पौर्णिमेचा सण आहे
आनंद आणि साधनेने भरलेले घर असो
जो पण येईल तुमच्या मनाजवळ
तो नेहमी आनंदाने भरलेला असो
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
…
क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचारने,
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते..
बुद्ध पौर्णिमा निमित्त,
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
…
वेळ आली आहे शांतीची,
आला आहे प्रेमाचा सण..
ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम,
अशा भगवान बुद्धांस माझे नमन..!
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
…
पौर्णिमेच्या तेजाने
तुमच्या जीवनातील
सर्व अंधार दूर होवो.
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा
…
बुद्ध पौर्णिमा
तुमच्या आयुष्यातील
अज्ञान अंधःकार दूर करेल
आणि तुम्हाला शांती आणि
ज्ञानमार्गाकडे घेऊन जाईल…
बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
…
चांगले बोला चांगले वागा
सत्याची साथ सदैव देत राहा
प्रेम व शांततेचा दिवा ह्रदयात
अखंड तेवत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
संबंधित बातम्या