दिवाळीसोबतच भाऊबीज हा सण भारतभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिपावली पाडवा आणि भाऊबीज देशभरात अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी भाऊबीज ३ नोव्हेंबरला आहे. रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊबीज हा देखील भाऊ-बहिणीचा सण आहे. या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करतात आणि व्रत देखील पाळतात. ज्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर धागा बांधतात, त्याचप्रमाणे भाऊबीजेच्या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळते.
भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर भाऊ बहीण आपल्या भावाला ओवाळते, भावाच्या निरोगी आयुष्यासाठी सदिच्छा देते. तर भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी किंवा भेट देऊन आपलं प्रेम व्यक्त करतो. भाऊबीज निमित्त आपल्या बहिण भावाला हे हटके शुभेच्छा देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणीत करा.
दिव्यांचा लखलखाट
घरी आला आज माझा भाऊराया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
…
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…
तुझ्या घरी हे तेज येवो आणि
तुझे घर आनंदाने भरो,
ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा
…
सोनियाच्या ताटी
उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहीणीची वेडीही माया….
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
…
मनाची आहे हीच इच्छा
तुला मिळो सर्व काही
जी आहे तुझी इच्छा.
प्रिय ताई तुला भाऊबीज शुभेच्छा
…
भाऊबीजेचा दिवस खूप खास आहे,
मनात प्रेम आणि विश्वास आहे.
माझ्या प्रिय भावा
तुला हॅपी भाऊबीज
…
तांदूळाचा सुवास आणि केशराचा रंग,
कपाळावर लागला टिळा आणि आली आनंदाची लाट,
बहिणीची साथ आणि भरपूर प्रेम,
तुम्हा सगळ्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा.
…
लाल-गुलाबी रंग आहे,
आनंदी सारा संसार आहे,
सूर्याची किरणं, आनंदाची बहार,
घरच्यांच प्रेम घेऊन भाऊबीजेचा सण आला आहे.
भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा
…
आनंदाचे सनई-चौघडे वाजले अंगणात,
सदैव दीप उजळो माझ्या भावाच्या जीवनात
आम्हा भाऊ-बहिणीचे प्रेम फुलू दे या संसारात
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
…
चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,
भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
…
दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची आणि
भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
…
दारी रांगोळी सजली,
ज्योतीने पणती सजली,
आली आली दिवाळी आणि भाऊबीज आली.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
…
दिवाळीला येऊ दे सुख, शांती , समृद्धी घरी,
यंदाच्या दिवाळीला माझी बहीण आली आहे माहेरी
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आला आला भाऊबीजेचा सण आला
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा