Bhaubeej 2004: कधी आहे भाऊबीज? भाऊबीजेला आहेत अनेक शुभयोग, जाणून घ्या तारीख आणि महत्त्व
मराठी बातम्या  /  धर्म  /  Bhaubeej 2004: कधी आहे भाऊबीज? भाऊबीजेला आहेत अनेक शुभयोग, जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

Bhaubeej 2004: कधी आहे भाऊबीज? भाऊबीजेला आहेत अनेक शुभयोग, जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

Oct 24, 2024 01:17 PM IST

Bhaubeej 2004: भाऊबीज हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी, अर्थात कार्तिक शुद्ध द्वितियेला असतो. या दिवसाला यमद्वितिया देखील म्हणतात. हा दिवस बहीण-भावाच्या प्रेमाचा प्रतिक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना आणि उपवास करते. जाणूया भाऊबीजेते महत्त्व…

किती तारखेला साजरी होणार भाऊबीज?
किती तारखेला साजरी होणार भाऊबीज? (हिंदुस्तान टाइम्स)

हिंदू धर्मात भाऊबीजेला मोठे महत्त्व आहे. भाऊबीज हा सण बहीण-भावाच्या प्रेमाचा सण आहे. तसेच तो बहीण भावाच्या नात्याच्या सन्मानाचा देखील दिवस आहे. पाच दिवसांचा दिवाळीचा सणही भाऊबीजेनंतर संपतो. भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी असतो. भाऊबीज हा सण देशभर साजरा होतो, तसेच तो देशभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. हा सण भाऊ-बहिणीचे नाते अधिक दृढ करतो. पाहूया यावेळी भाऊबीज कधी आहे...

कधी आहे भाऊबीज?

कार्तिक महिन्याच्या द्वितीया तिथीचा आरंभ २ नोव्हेंबर या दिवशी रात्री ८ वाजून २२ मिनिटांनी होत आहे. तर दुसऱ्या दिवशी ३ नोव्हेंबरला रात्री १० वाजून ०६ मिनिटांनी ही तिथी संपणार आहे. म्हणून भाऊबीज हा सण ३ नोव्हेंबरला साजरा होत आहे. खरे तर, ३ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजून ३९ मिनिटांपर्यंत सौभाग्य योग आहे. यानंतर शोभन योग सुरू होईल. म्हणून भाऊबीजेच्या दिवशी पूजेसाठी सर्वात उत्तम मुहूर्त ११ वाजून ४५ मिनिटांपर्यंत असणार आहे.

भाऊबीजेचे महत्त्व

हिंदू धर्मात भाऊबीजेच्या पर्वाची गणना प्रमुख आणि प्रसिद्ध सणांमध्ये केली जाते. भाऊबीजेचा सण हा बहीण-भावाचा सण आहे. हा सण त्यांच्या सन्मानाचा आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. बहीण-भावाच्या नात्याच्या संदर्भासह भाऊबीजेचे धार्मिक महत्त्व देखील सांगितले गेले आहे.

 शास्त्रांनुसार, कार्तिक शुक्ल द्वितीया तिथीला यम आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. तेथे यमाच्या बहिणीने यमाचे उत्तम स्वागत आणि आदरातिथ्य केले होते. याने यम प्रसन्न झाला आणि त्याने आपल्या बहिणीला वरदान दिले. यमाने दिलेल्या वरदानानुसार, जे भाऊ आणि बहिणी या दिवशी यमुना नदीत स्नान करून यमाची पूजा करतील त्यांना मृत्यूनंतर यमलोकात जावे लागणार नाही.

भाऊबीजेबाबत आणखीही धार्मिक मान्यता प्रसिद्ध आहे. ही मान्यता भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे. या मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण नरकासुराचा वध करून द्वारका नगरीत परतले होते. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण यांची बहीण सुभद्रा हिने फूले, मिठाई आणि दीप उजळून श्रीकृष्णांचे स्वागत केले होते. देवी सुभद्राने भगवान श्रीकृष्णाच्या मस्तकावर टिळा लावून त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होवो असे कामना केली होती. तेव्हापासून भाऊबीज साजरी केली जाते.

Whats_app_banner