Bhaubeej 2024: भाऊबिजेला बहिणींनी या वेळी भावांना चुकूनही ओवाळू नका; जाणून घ्या शुभ मुहूर्त
मराठी बातम्या  /  धर्म  /  Bhaubeej 2024: भाऊबिजेला बहिणींनी या वेळी भावांना चुकूनही ओवाळू नका; जाणून घ्या शुभ मुहूर्त

Bhaubeej 2024: भाऊबिजेला बहिणींनी या वेळी भावांना चुकूनही ओवाळू नका; जाणून घ्या शुभ मुहूर्त

Nov 02, 2024 06:49 PM IST

Bhaubeej tilak Shubh Muhurt: भाऊबीजेचा सण रविवारी, ३ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. बहिणी या दिवशी भावाला ओवाळतात आणि टिळा लावतात.

 भाऊबिजेला बहिणींनी या वेळी भावांना चुकूनही ओवाळू नका; जाणून घ्या शुभ मुहूर्त
भाऊबिजेला बहिणींनी या वेळी भावांना चुकूनही ओवाळू नका; जाणून घ्या शुभ मुहूर्त

bhaubeej 2024 :भाऊबीजेचा सण रविवारी, ३ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. बहिणी या दिवशी भावाला ओवाळतात आणि टिळा लावतात. यावेळी बहिणी आपल्या भावाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे यासाठी देवाकडे प्रार्थना करतात आणि यशासाठी शुभेच्छा देतात.

ज्योतिषाचार्य विभोर इंदूसुत यांच्यानुसार ३ नोव्हेंबर रोजी सूर्योदयाची वेळेपासून ते रात्री १० वाजून ५ मिनिटांपर्यंत द्वितीया तिथी असेल. या दिवशी सर्व शुभ चोघडिया मुहूर्त ओवाळणी आणि टिळा लावण्यासाठी उत्तम असतात. सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपासून ते ०९ वाजून १९ मिनिटांपर्यंतच्या वेळेत टिळा लावण्याचा पहिला मुहूर्त असेल. त्यानंतर सकाळी ९ वाजून २० मिनिटांपर्यंत ते १० वाजून ४१ मिनिटांपर्यंत या वेळेत लाभ चोघडियाचा मुहूर्त असेल. अमृत चोघडिया सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपासून दुपारी १२ या वेळेत होणार आहे. त्यामुळे भावाला टिळा लावण्यासाठी सर्वात शुभ आणि उत्तम काळ सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल.

ज्योतिष अन्वेषक अमित गुप्ता यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ३ नोव्हेंबर रोजी राहुकाल संध्याकाळी ०४ वाजून ३० मिनिटांपासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच्या वेळेत असेल. या दरम्यानच्या काळात, बहिणींनी भावाला टिळा लावू नये. राहूकालात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करणे टाळावे. ज्या बहिणी दिवसा भावाला टिळा लावू शकणार नाहीत, अशा बहिणींना सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत शुभ आणि अमृत चोघडिया या कालावधीत भावाला ओवाळून टिळा लावू शकते.

असे मानले जाते की भाऊबिजेच्या दिवशी बहिणीच्या अंगठीच्या बोटात अमृत तत्व बाहेर पडते, त्यामुळे बहिणींनी आपल्या उजव्या हाताच्या अंगठीबोटाने भावाला टिळक करावे. टीळा लावताना भावाने आपला चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवावा. बहिणींनी यावेळी भावाला शुभेच्छा द्याव्यात. त्यांनी या वेळेत टिळक करून आणि अक्षत लावावे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner