Bhaubeej Katha : भाऊबीजच्या दिवशी वाचा यमराज आणि यमुनाने कसा साजरा केला होता हा सण, जाणून घ्या कथा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Bhaubeej Katha : भाऊबीजच्या दिवशी वाचा यमराज आणि यमुनाने कसा साजरा केला होता हा सण, जाणून घ्या कथा

Bhaubeej Katha : भाऊबीजच्या दिवशी वाचा यमराज आणि यमुनाने कसा साजरा केला होता हा सण, जाणून घ्या कथा

Nov 03, 2024 10:13 AM IST

Bhau Beej Katha In Marathi : यावर्षी ३ नोव्हेंबर रोजी भाऊबीजचा सण साजरा केला जाणार आहे. भाऊबीजच्या दिवशी अनेक लोक बहीण यमुना आणि भाऊ यमराज यांची कथा ऐकतात. कथा वाचल्याशिवाय भाऊबीजची पूजा अपूर्ण मानली जाते.

भाऊबीज कथा
भाऊबीज कथा

Bhaubeej Katha : भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यात द्वितीया तिथीला साजरा केला जातो. यंदा रविवार, ३ नोव्हेंबर रोजी भाऊबीजची पूजा केली जाणार आहे. पूजा संपल्यानंतर बहिणी एका शुभ मुहूर्तावर भावाला टिळक लावतात. भाऊबीजच्या दिवशी अनेक लोक बहीण यमुना आणि भाऊ यमराज यांची कथा ऐकतात आणि सांगतात. कथा वाचल्याशिवाय भाऊबीजची पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे या दिवशी पूजेदरम्यान भाऊबीजची कथा अवश्य वाचा.

भाऊबीजची कथा

भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात, यामागे एक कथा प्रचलित आहे. छाया ही भगवान सूर्य नारायण यांची पत्नी आहे. छाया आणि सूर्याला दोन अपत्य होती. मुलाचे नाव यम आणि मुलगी यमुना अशी त्याची नावे होत. सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला खूप कमी जात असे. यमाला माहीत होते की तो मृत्यूची देवता आहे म्हणून आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्या वर कोणतेही संकट यायला नको आणि म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा. यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे त्यांच्या घरी येणे अजिबात आवडत नव्हते, पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती.

एकदा यमुनेने यमाला आपल्या घरी येण्यासाठी खूप कळकळीची विनंती केली. त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले. यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुने नेे त्याचे अगदी आनंदाने आदरतिथ्य केले. पाटावर बसवून त्याला ओवाळले..! यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला, यमुने माग अजुन काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून. तेव्हा बहीण भावाला म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी जेवण करायला येशील आणि जी बहीण आपल्या भावाला या दिवशी जेवू घालेल आणि टिळा करेल त्यांना आपला भय नसावा.

यामुळे भाऊबीजेच्या दिवशी बहिणींनी यमाची पूजा करावी आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. या दिवशी देशातील काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताचे पूजन केले जाते. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते.

श्रीकृष्णाशी संबंधीत कथा

भाऊबीजे संबंधित आणखी एक पौराणिक कथा श्रीकृष्णाशी संबंधित आहे. त्यानुसार भगवान श्रीकृष्ण नरकासुर राक्षसाचा वध करून द्वारकेला परतले. कृष्णाची बहीण सुभद्रा हिने फळे, फुले, मिठाई आणि अनेक दिवे लावून त्यांचे स्वागत केले. त्यांनी भगवंताच्या कपाळावर टिळक लावून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

Whats_app_banner