Bhaubeej Tilak Muhurt 2024: रविवार, ३ नोव्हेंबर रोजी भाऊबिजेचा शुभ सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान चित्रगुप्ताची पूजा केली जाते. तसेच वही, पेन आदि साहित्याची देखील पूजा केली जाते. परंपरेनुसार या दिवशी भावांनी आपल्या बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे आणि पैसे, कपडे इत्यादी काही भेटवस्तू देऊन बहिणींचा सन्मान करावा. त्यामुळे भावांचे वय आणि कीर्ती वाढते, असे मानले जाते. कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळा लावते आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करते.
यंदा भाऊबिजेच्या तारखेबाबत कोणताही संभ्रम नाही. दिवाळी अमावस्येच्या तारखेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण भाऊबीज ३ नोव्हेंबर २०२४ रोजीच साजरी केली जाईल, यात कोणतेही दुमत नाही. या दिवशी तारीख सुरू झाल्यानंतर दुपारी ०१ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ०३ वाजून २२ मिनिटांपर्यंत चांगली वेळ मिळेल. या दिवशी टिळक लावणयासाठी शुभ मुहूर्त २ तास १२ मिनिटे इतका आहे.
भाऊबिजेच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो आणि गोडधोड खातो. भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी आकाशात चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीला ओवाळते. त्यानंतर ती भावाला पाटावर बसवते. तेथे ती दिवा, हळद-कुंकू, अक्षता याने सजवलेले ताट घेऊन प्रथम चंद्राला ओवाळते आणि त्यानंतर आपल्या भावाला ओवाळते. त्यानंतर भाऊ बहिणीच्या ताटाक बहिणीला ओवाळणी देतो. या सणामुळे बहीण-आणि भावाचे नाते घट्ट होते.
यावेळी चंद्राला दहीभातचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच बहीण भावाला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाऊ घालते. यात लाडू, करंजी, शंकरपाळी, चिवडा, चकली, गुलाबजाम आणि इतर गोड पदार्थांचा समावेश असतो.
भाऊबिजेचा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथा सागितली जाते. या कथेनुसार, एके दिवशी बहीण यमुनेने भाऊ यमराजला गोलोकात जेवणासाठी बोलावले. तेव्हा यमाने बहिणीच्या घरी जाण्यापूर्वी नरकात असलेल्या लोकांची सुटका केली. म्हणून भाऊबिजेचा सण साजरा केला जातो.
याशिवाय भगवान श्रीकृष्णाशीही एक कथा जोडली गेली आहे. या कथेनुसार भगवान श्रीकृष्ण नरकासुर राक्षसाचा पराभव करून आपली बहीण सुभद्रा यांना भेटायला गेले होते. बहीण-भावाच्या या भेटीनंतर हा दिवस पुढे भाऊबीज म्हणून साजरा केला जातो.
Dislciamer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.