Bhaubeej 2023: तुमचा भाऊ तुमच्यापासून दूर आहे? 'अशी' करा ओवाळणी, नात्यात येईल गोडवा!
Diwali 2023: भाऊबीजच्या बहिण भावाला ओवाळते तसेच त्याच्या त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते.
Bhaubeej Importance In Marathi: कार्तिक महिन्यात हिंदू धर्मातील अनेक सण येतात. ज्यामध्ये करवा चौथ, धनत्रयोदशी, दिवाळी, गोवर्धन, भाऊबीज इत्यादी सणांचा समावेश आहे. या सणांमध्ये येणाऱ्या भाऊबीजला विशेष महत्त्व आहे. हा सण भाऊ-बहिणीतील प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. या दिवशी बहिण भावाला ओवाळते तसेच त्याच्या त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते.
ट्रेंडिंग न्यूज
भाऊबीजच्या दिवशी बहिणीही आपल्या भावाच्या आवडीचे पदार्थ बनवतात. भाऊदेखील बहिणीला भेटवस्तू देतात. मात्र, काही कारणास्तव तुमचा भाऊ तुमच्यापासून दूर असेल तर, निराश होण्याची गरज नाही. विधीनुसार, पूजा करुन बहिण त्यांच्या भावासाठी प्रार्थना करु शकतात.
भाऊ दूर असल्यास 'अशी' करा ओवाळणी
- भाऊबीजच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. तसेच घरातील मंदीर स्वच्छ करावेत.
- तुमचे जितके भाऊ तुमच्यापासून दूर आहेत, तितके नारळ आणा.
- नंतर पाट्यावर पिपळ्या रंगाचे कापड आथरुन तिथे नारळ ठेवा.
- फुलांच्या वर तांदूळ ठेवा आणि त्यावर नारळ ठेवा. नाराळाला पाण्याने धुऊन त्यावर तांदूळ आणि कुंकूवाचा टीळा लावावा.पूजेनंतर त्यांना मिठाई अर्पण करावी. आरतीनंतर नारळ पिवळ्या रंगाच्या कापड्याने झाकून ठेवावे.
- तसेच तुमच्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा.
- दुसऱ्या दिवशी हे नारळ पूजेच्या ठिकाणावरुन हलवावे. शक्य असल्यास नारळ आपल्या भावाला पाठवावे.
पौराणिक कथेनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला यम आपली बहीण यमुना हिच्या घरी अन्नासाठी गेला होता. अशा स्थितीत भावांनी बहिणीच्या सासरच्या घरी जावे. तर अविवाहित मुलींनी आपल्या भावाचे तिलक घरीच करावे. भाऊबीजच्या दिवशी सर्व प्रथम श्रीगणेशाचे ध्यान आणि पूजा करावी. भावाचे टिळक करण्यासाठी प्रथम बहिणींनी दिवाळीच्या फरळाचे ताट तयार करावे. तसेच भावाचे आवडते पदार्थही त्यात ठेवावे. भावाने बहिणीकडून आशीर्वाद घेऊन तिला काही भेटवस्तू द्याव्यात.
विभाग