Bhanu Saptami : भानुसप्तमीला करावी सूर्यपूजा; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि लाभ
मराठी बातम्या  /  धर्म  /  Bhanu Saptami : भानुसप्तमीला करावी सूर्यपूजा; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि लाभ

Bhanu Saptami : भानुसप्तमीला करावी सूर्यपूजा; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि लाभ

Dec 08, 2024 08:31 AM IST

Bhanu Saptami 2024 In Marathi : मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीच्या दिवशी भानुसप्तमी साजरी केली जाते. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर भानुसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे फायदेशीर ठरू शकते.

भानुसप्तमी
भानुसप्तमी

Bhanu Saptami 2024 In Marathi : धार्मिक मान्यतेनुसार भानुसप्तमीचा दिवस सूर्य पूजेचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान सूर्याची पूर्ण विधीने पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी भानुसप्तमी साजरी केली जाते. असे म्हटले जाते की, जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर भानुसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे लाभदायक ठरू शकते. भानुसप्तमीचे व्रत केल्याने व्यक्तीला चांगले आरोग्यही प्राप्त होते. भानुसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा कशी करावी आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे हे जाणून घेऊया.

भानु सप्तमी कधी आहे आणि पूजेची वेळ कोणती?

हिंदू पंचांगानुसार, डिसेंबर महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी ०७ डिसेंबर रोजी रात्री ११.०५ वाजता सुरू होईल आणि ०८ डिसेंबर रोजी सकाळी ९:४४ वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार ८ डिसेंबर रोजी भानु सप्तमीचे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी पूजेसाठी सर्वात शुभ वेळ सकाळी ०६:०१ ते ०६:३३ पर्यंत आहे.

भानूसप्तमी सूर्य पूजा विधी -

ब्रह्म मुहूर्तात सकाळी उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. गणपती बाप्पाचे ध्यान करा. तांब्याच्या भांड्यात पाणी, लाल फुले, कुंकू, अक्षदा आणि काळे तीळ मिसळून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना सूर्यमंत्र आणि गायत्री मंत्राचा जप करावा. अर्घ्य देताना पाण्याच्या प्रवाहाकडे पाहून सूर्यदेवाचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. यानंतर सूर्यदेवाला धूप किंवा तुपाचा दिवा दाखवा आणि ३ वेळा प्रदक्षिणा करा. शेवटी क्षमाप्रार्थना करा.

भानु सप्तमीला सूर्यदेवाची पूजा केल्याने काय फायदे होतात?

भानुसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते.

या विशेष दिवशी भगवान सूर्याला अर्घ्य दिल्याने आत्मविश्वास वाढतो.

या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने धन-धान्य वाढते.

या दिवशी दान केल्याने देखील शुभ फळ मिळते.

सूर्यदेवाची पूजा केल्याने मान-सन्मान मिळतो आणि सौभाग्यही वाढते.

सूर्य मंत्र

  • ॐ सूर्याय नमः ॐ सूर्याय नमः
  • ॐ भास्कराय नमः ॥
  • ॐ आदित्य नमः ॐ आदित्य न

भानू सप्तमी उपाय : 

भानुसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देणे, सूर्यमंत्राचा जप करणे आणि ११ वेळा सूर्य चालीसा पठण केल्यास करिअर आणि आर्थिक जीवनात सुरू असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात.

(डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner