Bhanu Saptami 2023 : कुंडलीतल्या सूर्याला प्रबळ करायचं असेल तर अवश्य करा भानुसप्तमीचं मत
Ratha Saptami 2023 : हिंदू कॅलेंडरनुसार, भानु सप्तमीचं व्रत दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या सप्तमीला पाळलं जातं. या व्रताचे विशेष पौराणिक महत्त्व सांगण्यात आले आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, भानु सप्तमीचं व्रत दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या सप्तमीला पाळलं जातं. या व्रताचे विशेष पौराणिक महत्त्व सांगण्यात आले आहे. ०९ जुलै २०२३ रोजी कृष्ण पक्षातील भानु सप्तमी साजरी केली जाणार आहे. भानु सप्तमीला रथ सप्तमी या नावानेही ओळखलं जातं.
ट्रेंडिंग न्यूज
भानुसप्तमीला का केली जाते सूर्यदेवाची पूजा?
रथ सप्तमी किंवा भानु सप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. भानु सप्तमीला सूर्यदेवाची आराधना केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व मानसिक आणि शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळते, अशी पौराणिक मान्यता आहे. याशिवाय ज्या लोकांच्या लग्न कुंडलीत सूर्य कमकुवत आहे, त्यांनी भानु सप्तमी व्रत केल्यास कुंडलीतील सूर्य बलवान होतो असं शास्त्र सांगतं.
रथ सप्तमीला सूर्य सप्तमी, अचला सप्तमी, सूर्यरथ सप्तमी, भानु सप्तमी आणि आरोग्य सप्तमी असेही म्हणतात. कुंडलीत सूर्य बलवान असताना हे व्रत पाळल्यास करिअर आणि व्यवसायात यश मिळते. तसेच उत्पन्नात वाढ,आनंद आणि नशिबात वाढ होते. इच्छित नोकरीही मिळते.
कसं करावं भानुसप्तमीचं व्रत?
०९ जुलै रोजी ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
सूर्योदय होताना सूर्यदेवाला नमस्कार करून उपवासाचे व्रत करावे.
वाहत्या पाण्याच्या प्रवाहात काळे तीळ वाहावेत.
पाण्यात तांदूळ, काळे तीळ, रोळी आणि दुर्वा मिसळून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावं.
सूर्यदेवाची पूजा करताना कोणत्या मंत्रांचा जप करावा?
पंचोपचार केल्यानंतर सूर्यदेवाची फळे, फुले, धूप-दीप, अक्षता, दुर्वा इत्यादींनी पूजा करावी. शेवटी सूर्य चालीसा आणि सूर्य कवच पठण करा. सूर्यदेवाची पूजा केल्यानंतर पूजा संपवून गरीब आणि गरजूंना दान करावं.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या