Bhairavachandi Yag : नवीन वर्षाच्या सुरवातीलाच सेवेकऱ्यांना मोठी संधी मिळाली असून, गुरू माऊली यांच्या आशीर्वादाने सर्व सेवेकऱ्यांसाठी ४ जानेवारी २०२५ रोजी श्री कृष्णा गोशाळा गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथे भव्य दिव्य श्री भैरवचंडी हवन युक्त याग संपन्न होणार आहे. यामाध्यमातून आपल्याकडून पाच यज्ञ करून घेतले जाणार आहेत. पंच महा यज्ञ, नवचंडी याग, रुद्र याग, भैरव चंडी याग, कामधेनु याग. ह्या सेवेमुळे आपल्या गेल्याजन्माचे प्रारब्ध संपवून, ह्या जन्मीचे संचित सुधारून आपले सर्व प्रश्न मार्गी लागतात असे सांगितले जाते.
भैरव-चंडी पूजा ही हिंदू धर्मातील एक शक्तिशाली उपासना आहे, जी मुख्यतः देवी भैरवी आणि चंडिकेच्या उपासनेसाठी केली जाते. या पूजेचे अनेक आध्यात्मिक, मानसिक, आणि भौतिक फायदे आहेत. या सेवेचा लाभ घेण्यासाठी विविध शहरातील स्वामी सेवेकरी शनिवारी ४ तारखेला त्र्यंबकेश्वर येथे पोहचले आहेत.
भैरव आणि चंडी उपासना संकटांपासून संरक्षण देते. ही पूजा नकारात्मक ऊर्जा, अडथळे, आणि शत्रूंच्या प्रभावापासून बचाव करते.
ही पूजा मनाला स्थिरता आणि शांतता देते. भक्तांच्या मनातील भीती, चिंता आणि ताण कमी करण्यास मदत करते.
भैरव-चंडी उपासनेतून आध्यात्मिक शक्ती आणि आत्मबल वाढते. भक्तांना आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य मिळते.
भैरव-चंडी उपासना विशेषतः आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी उपयुक्त मानली जाते. ही पूजा संपत्ती, समृद्धी आणि यश प्राप्तीसाठी केली जाते.
शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी या पूजेला विशेष महत्त्व आहे.
ही पूजा मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. काही भक्त या पूजेला रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी करतात.
भैरव आणि चंडीची कृपा भक्ताला आध्यात्मिक मार्गावर पुढे नेते. आत्मज्ञान प्राप्ती आणि मोक्षासाठी या उपासनेचे महत्त्व आहे.
पूजा करण्यापूर्वी शुद्ध आंघोळ आणि मनःशुद्धी करावी. भैरव-चंडीचे विशेष मंत्र जसे की भैरव गायत्री मंत्र किंवा चंडी सप्तशतीचा पाठ करणे लाभदायक आहे. या पूजेत श्रद्धा आणि समर्पण खूप महत्त्वाचे आहेत.
ही पूजा अनुभवी गुरु किंवा पंडितांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते, कारण मंत्र आणि विधी योग्य पद्धतीने पार पाडणे आवश्यक आहे.
सर्व संकटे, दोष, समस्या, गंभीर प्रश्न, कोर्ट कचेरी, शेती भांडण, भाऊकी, बाधा नष्ट होते. मुलांचे विवाह प्रश्न सुटतात, शारीरिक व्याधी, गंभीर आजार संपून जाते. शत्रूनाश होतो. आर्थिक समस्या, सौभाग्य, संरक्षण, शिक्षण, कुलस्वामिनी कृपा प्राप्ती, निसर्ग निर्मित व मानव निर्मित संकटाचे निवारण, संतती प्राप्ती, नोकरीत स्थैर्य, व्यवसायातील सर्व प्रकारच्या बाधा, नकारात्मक शक्ती नष्ट होतात. त्वरीत कार्य सिद्धी होते. कुंडातील सर्व दोषांचा परिहार होतो. या व अशा अनेक नानाविध प्रश्नांवर हवणात्मक श्री भैरवचंडी सेवा रामबाण उपाय ठरते.
संबंधित बातम्या