मराठी बातम्या  /  धर्म  /  pithori amavasya upay : पिठोरी अमावस्येला करा यापैकी एक कृती, पितरांचा आशीर्वाद मिळून होईल भरभराट

pithori amavasya upay : पिठोरी अमावस्येला करा यापैकी एक कृती, पितरांचा आशीर्वाद मिळून होईल भरभराट

HT Marathi Desk HT Marathi
Sep 14, 2023 11:55 AM IST

Kushgrahani Amavasya upay 2023 : पिठोरी अमावस्येचा आजचा दिवस पितरांच्या आशीर्वादासाठी महत्त्वाचा मानला जातो.

Bhado Amavasya 2023
Bhado Amavasya 2023

bhado amavasya upay 2023 : भगवान विष्णूला समर्पित असलेली भाद्रपद कृष्ण पक्षातील अमावस्या आज आहे. ही अमावस्या पिठोरी आणि कुशग्रहणी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. या अमावस्येला स्नान, दान आणि तर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. याशिवाय, धर्मशास्त्रानुसार व काही मान्यतांनुसार, अमावस्‍या तिथीला काही विशिष्ट उपाय केल्‍यानं आर्थिक समृद्धीचा मार्ग खुला होतो. पितरांचा आशीर्वाद मिळतो, असं मानलं जातं.

आर्थिक भरभराटीसाठी पिठोरी अमावस्येच्या दिवशी यापैकी एक कृती करा?

  • पिठोरी तथा भाद्रपद अमावस्येच्या दिवशी आपल्या जवळच्या पवित्र नदीत स्नान करावं. त्याचवेळी सूर्यदेवाला नमस्कार करावा आणि काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडावेत. असं केल्यानं पितृदोष दूर होतो आणि धनधान्य, संपत्ती वाढते.
  • पिठोरी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं शुभ मानलं जातं. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी व सद्गतीसाठी नदीत तर्पण किंवा पिंड दान करावं. यानंतर ब्राह्मण भोज घालावा व यथाशक्ती ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी. असं केल्यानं पितरं प्रसन्न होतात आणि घरात सुख-समृद्धी येते अशी एक मान्यता आहे.
  • या अमावस्येच्या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सकाळी-सकाळी पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करावं. हे दूध पाण्यात मिसळलेलं असावं. याशिवाय संध्याकाळी राईच्या तेलाचे दीप प्रज्वलित करावेत. त्यानंतर विष्णू देव आणि पितरांना प्रार्थना करावी. या पूजाविधीमुळं घरात समृद्धी येण्याचा मार्ग खुला होतो, अशी श्रद्धा आहे.
  • भाद्रपद अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा देखील करावी. या दिवशी शनिदेवाच्या मूर्तीला तेल लावावे. त्यानंतर शनिदेवाच्या मूर्तीसमोर राईच्या तेलाचे दीप लावावेत. यामुळं शनिदोषापासून मुक्ती मिळते, असं मानलं जातं.

 

(या लेखात दिलेली माहिती धार्मिक मान्यता व श्रद्धांवर आधारीत आहे. ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा हिंदुस्तान टाइम्स मराठीचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.)

WhatsApp channel

विभाग