Ganeshotsav 2023 : आयुष्यातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी उपयोगी ठरतील श्रीगणेशाचे 'हे' पाच मंत्र
Lord Ganesh Mantras : कोणत्याही कामाची सुरुवात गणेशपूजनानं करण्याची रीत आपल्याकडं आहे. त्यासाठी काही मंत्र उपयुक्त ठरतात.
Ganeshotsav 2023 : आबालवृद्धांना हवाहवासा वाटणारा गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. येत्या १९ तारखेला गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होत आहेत. या निमित्तानं सर्वत्र उत्साह दाटला असून गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. पूजा, आरती आणि मंत्रपठनाची तयारी केली जात आहे. बाप्पा घरी असेपर्यंत प्रत्येक दिवशी काय नैवेद्य करायचा याचंही नियोजन सुरू आहे.
ट्रेंडिंग न्यूज
काही घरांत गणपती येत नसला तरी उत्साह तसूभरही कमी नसतो. गणपतीच्या दिवसांत अशा घरांमध्येही बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. मंत्रोच्चारानं वातावरण भारून जातं. गणेशोत्सवाच्या निमित्तानं श्रीगणेशाला प्रसन्न करणारे पाच शक्तिशाली मंत्र आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या मंत्रांच्या उच्चारणानं जीवनातील अडथळे दूर होतात. जीवन जगण्यासाठी एक नवी ऊर्जा मिळते.
हे आहेत गणेशाचे पाच मंत्र
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नम कुरु में देवं सर्वकार्येषु सर्वदा
गजाननं भूतगणाधिसेवितं,
कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् ।
उमासुतं शोकविनाशकारकम्न,
मामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् ॥
अर्थ : हे वक्रतुंडा, महाकाय शरीर आणि कोट्यवधी सूर्यांप्रमाणे तेज असलेल्या देवा माझी सर्व कामे सदैव विना अडथळा होऊ दे. गजासारखे मुख असलेल्या, ज्याची सेवा भूतगण व इतर प्राणीमात्र करतात, जो भक्तांनी अर्पण केलेला प्रसाद चवीनं आणि आनंदानं सेवन करतो, सर्व संकटांचा नाश करणारी देवी (उमा) पार्वतीचा जो पुत्र आहे, त्या विघ्नेश्वर गणेशाच्या चरणांना मी नमन करतो.
लाभ : या मंत्राचा जप केल्यानं एखाद्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. धन, बुद्धी, ऐश्वर्य, समृद्धी मिळते. सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळते.
ॐ एकदंतय विद्महे, वक्रतुंडाय धीमही, तन्नो दंति प्रचोदयात..!!
अर्थ : सर्वव्यापी अशा एक दंत भगवंताची आपण पूजा करतो. ही प्रार्थाना असते भगवंताकडून बुद्धीचं दान मागण्यासाठी. ज्ञानाच्या प्रकाशानं आपलं मन उजळून टाकण्यासाठी त्या एकदंतासमोर आपण नतमस्तक होतो.
लाभ : हा मंत्र पठण करणारी व्यक्ती नम्र, धार्मिक आणि त्याच्या बुद्धीला धार चढते.
ओम गं गणपतये नमः !!
अर्थ : आपलं संपूर्ण अस्तित्व गणेशाच्या चरणी अर्पण करून आणि त्याचे सर्व महान गुण आपल्यात यावेत अशी प्रार्थना करणं.
फायदा: हा मंत्र भक्ताच्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर करतो. या मंत्राच्या उच्चारणामुळं नव्या उपक्रमांमध्ये यश मिळतं. कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा.
ओम नमो सिद्धि विनायकाय सर्व कार्य कर्त्रेय सर्व विघ्नप्रशम्नाय सर्वजय वश्यकर्णाय सर्वजन सर्वस्त्री पुरुष आकर्षणाय श्रींग ओम स्वाहा..!!
अर्थ : ‘सिद्धी विनायक’ या शब्दाचा अर्थ सिद्धी आणि ज्ञानाचा देव. बुद्धी आणि आनंदाच्या स्वामी असलेल्या हे भगवंता केवळ तूच सर्व काही शक्य करू शकतोस आणि प्रत्येक प्रयत्नाला यश देऊ शकतोस.
लाभ: आयुष्यात शांतता, भरभराट आणि अध्यात्मिक ज्ञान प्राप्तीसाठी, भौतिक गरजांच्या पूर्ततेसाठी आणि सामाजिक प्रभाव वाढवण्यासाठी गणेशभक्तांनी १०८ वेळा या मंत्राचा जप केला पाहिजे.
ओम विज्ञानाश्नाय नमः !!
अर्थ : जीवनातील विघ्ने दूर करण्यासाठी गपणतीची पूजा केली जाते. विघ्नाचा नाश करणाऱ्या विघ्नहर्त्याला मी नमन करतो.
लाभ : रोजच्या आयुष्यात, नातेसंबंधात, कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करताना काडी अडचणी येत असतील या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
विभाग