
Bedroom Colour Vastu Tips : गेल्या काही वर्षांपासून घरामध्ये चांगल्या प्रकारचं बेडरुम्सची मागणी वाढत आहे. बेडरुममधील रंग, साहित्य, बेड्स आणि अन्य गोष्टींबाबत मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते. परंतु घरात असलेल्या बेडरुममधील काही गोष्टींवरून तुमचं भविष्य आणि घरातील सुख-शांती अवलंबून असते. बेडरुममध्ये केलेली एक चूक घरातील लोकांना चांगलीच महागात पडू शकते. त्यामुळं आता बेडरुममध्ये कोणत्या प्रकारचा शुभ रंग असावा किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेवूयात...
घराची बांधणी कुठल्याही दिशेला झालेली असली तर बेडरुमची दिशा मात्र दक्षिण-पश्चिम अशीच असायला हवी. कारण हे कुटुंबातील लोकांच्या सुख आणि शांतीसाठी घातक मानलं जातं. बेडरुम दक्षिण-पश्चिम दिशेला असल्यास त्यामुळं तुमची आर्थिक संकटांतून सुटका होण्याची शक्यता असते. या दिशेला बेडरुमची व्यवस्था केल्यास त्यामुळं तुमच्या आयुष्यात नकारात्मकता येत नाही. तसेच आरोग्य आणि करियरमध्ये नेहमीच सकारात्मक गोष्टी घडतात. त्यामुळं घरातील बेडरुमची दिशा नेहमीच दक्षिण-पश्चिम अशी ठेवायला हवी.
घरातील बेडरुममध्ये रात्रीच्या वेळी भीती निर्माण करणारा भडक रंग असता कामा नये, त्यामुळं तुमच्या घरातील सुख, शांती आणि समृद्धी गायब होण्याची शक्यता असते. पेस्टल कलर्सचा वापर करून बेडरुमच्या भिंती रंगवायला हव्यात. त्यामुळं बेडरुममध्ये तुम्हाला शांतता लाभेल आणि रात्रीच्या वेळी निवांत आणि गाढ झोप येण्यास मदत होईल. याशिवाय बेडरुमच्या विरुद्ध दिशेला कोणताही आरसा किंवा काचेच्या वस्तू ठेवणं देखील अशुभ मानलं जातं. त्यामुळं घरातील लोकांना अस्वस्थ वाटून त्यांची शांतता भंग होवू शकते.
बेडरुममध्ये नकारात्मक उर्जा निर्माण करणारे फोटो लावणं टाळायला हवं. भांडणं किंवा कहलचा अर्थ दर्शवणारे किंवा अन्य वादातीत मुद्द्यांवरील फोटो बेडरुममध्ये लावू नये. कारण त्यामुळं घरातली लोकांचं आयुष्यात नैराश्य येण्याची शक्यता असते. आयुष्यातील काही आनंदी आणि सुख देणाऱ्या क्षणांचे फोटो बेडरुममध्ये लावल्यास तुमच्या आयुष्यात उत्साह निर्माण होण्यास मदत होईल.
संबंधित बातम्या
