आपल्या घरात एखाद्या चिमुकल्याच्या जन्मानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे त्या बाळाचे नाव काय ठेवावे. सध्याच्या युगात बहुतांश लोक ट्रेंडनुसार विविध प्रकारची नावे आपल्या मुलांसाठी निवडतात. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या बाळाचे नाव जन्म तिथी पाहून अथवा एखाद्या देवी-देवतांच्या नावावरुन ठेवल्यास अत्यंत शुभ असते. असे केल्याने त्या बाळाचे भविष्य उज्वल होते. कारण बाळाच्या नावाचा पूर्ण प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो. त्यामुळे आपल्या बाळाचे नाव निवडताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
आजची आपली ही बातमी खास मुलींसाठी असणार आहे. यामध्ये आज आपण मुलींची काही नावे पाहणार आहोत. ही नावे फारच खास असणार आहेत. कारण ही नावे देवी लक्ष्मीच्या नावावरून असणार आहेत. जर तुम्ही तुमच्या मुलींना यापैकी कोणतेही नाव दिल्यास आयुष्यभर त्या मुलीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे. माता लक्ष्मीला विविध नावांनी ओळखले जाते. वैदिक शास्त्रात लक्ष्मी देवीची खूपच सुंदर नावे सांगितली आहेत. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.
हिंदू धर्मानुसार, माता लक्ष्मीला सौभाग्य, संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हटले जाते. माता लक्ष्मीला सौंदर्याचे प्रतिक मानले जाते. देवी लक्ष्मी हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहे. प्रत्येक हिंदू घरामध्ये श्रीगणेशासोबत माता लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मी देवीच्या कृपेने घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते. घरातील धनधान्यात भरभराटी येते. शिवाय सुखसमृद्धी नांदते. त्यामुळेच लोक आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा करतात. हिंदू धर्मातील प्रत्येक लोकांची इच्छा असते की आपल्या घरात देवी लक्ष्मीने प्रवेश करावा. आणि वास करावा. त्यामुळेच जेव्हा घरात मुलीचा जन्म होतो तिला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. आज आपण अशी पाच नावे पाहणार आहोत जी देवी लक्ष्मीचीच विविध नावे आहेत.
देवश्री- देवी लक्ष्मीचे दुसरे नाव 'देवश्री' आहे. जर जन्म तिथीनुसार तुमच्या मुलीचे नाव 'द' अक्षराने सुरू होत असेल, तर तुम्ही तिचे नाव देवश्री ठेवू शकता. अशाने देवी लक्ष्मी नेहमीच तिच्यावर प्रसन्न राहील.
कृती- देवी लक्ष्मीला 'कृती' नावानेही ओळखले जाते. कृती नावाचा अर्थ 'काम' आणि 'कला' असे आहे. हे नाव तुम्ही तुमच्या मुलीला दिल्यास अत्यंत शुभ ठरेल.
धन्या- ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या मुलीचे नाव 'धन्या' देखील ठेवू शकता. माता लक्ष्मीला धन्या म्हणूनही ओळखले जाते. धन्या या नावाचा अर्थ महान, योग्य, भाग्यवान, शुभ आणि आनंदी असा होतो.
श्रद्धा- शास्त्रानुसार तुम्ही तुमच्या मुलीचे नाव 'श्रद्धा'देखील ठेऊ शकता. श्रद्धा नावाचा अर्थ पूजा, भक्ती, आदर आणि विश्वास असा आहे. तुमच्या मुलींसाठी हे नाव अत्यंत शुभ ठरेल.
संबंधित बातम्या