Bali Prayipada: बळीपूजा या नावाने प्रसिद्ध असलेली बलि प्रतिपदा कार्तिक मासाच्या प्रतिपदेला म्हणजेच यंदा १ नोव्हेंबर या दिवशी आहे. बलिप्रतिपदा किंवा बळीपूजा ही बळीराज्याच्या पृथ्वीवर परत येण्याचे प्रतिक म्हणून साजरी केली जाते. भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन राजा बळीला पाताळलोकात धाडले होते अशी कथा सांगितली जाते.
असे मानले जाते की भगवान विष्णूद्वारे दिल्या गेलेल्या वरदानामुळे बळीराजाची पूजा केली जाते. हिंदु धर्मग्रंथांनुसार, भगवान विष्णूने वामन अवतार धारण करून राजा बळीला पाताळलोकात धाडले होते. तथापि, बळीराजाच्या उदारतेमुळे भगवान विष्णूने राजाला पुन्हा भूलोकी म्हणजेच पृथ्वीवर जाण्यासाठी ३ दिवसांची अनुमती दिली होती. त्यानंतर पहिल्यांदा बळीराजा कार्तिक प्रतिपदेला पृथ्वीवर आला. असे मानले जाते की, बळीराजा ३ दिवस पृथ्वीवर राहतो आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतो.
या वर्षी बलिप्रतिपदेची पूजा ०२ नोव्हेंबर २०२०४ रोजी आहे. प्रतिपदा तिथी शुक्रवार, ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ०६ वाजून १६ मिनिटांनी सुरू होईल. तर, प्रतिपदा तिथीची समाप्ती ०२ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ०८ वाजून २१ मिनिटांनी होईल.
> बलिप्रतिपदा पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ०६ वाजून ०६ मिनिटांपासून ते ०८ वाजून २० मिनिटांपर्यंत असेल
> बळीपूजा सायान्हकाल मुहूर्त दुपारी ०३ वाजून ०२ मिनिटांपर्यंत ते संध्याकाळी ०५ वाजून १६ मिनिटांपर्यंत असेल.
> सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून पूजास्थान गंगाजलाने पवित्र करावे.
> पूजेच्या ठिकाणी भगवान विष्णू, राजा बळी आणि गोवर्धन पर्वताच्या मूर्ती ठेवाव्यात.
> गोवर्धन पर्वताचे प्रतिक म्हणून शेणाचा छोटा डोंगर बनवून त्याची पूजा करावी.
> धूप, दिवा, अक्षत, फुले, कुंकुम, मिठाई आणि धान्य अर्पण करा. तसेच देवासाठी अन्नकूट आणि छप्पन भोग तयार करा.
> यानंतर भगवान विष्णू आणि राजा बळी यांचे ध्यान करा, त्यांना अक्षत, फुले आणि धूप अर्पण करा आणि आरती करा.
> बली प्रतिपदेला गाईच्या पूजेला विशेष महत्त्व आहे, म्हणून या दिवशी गाईला गूळ आणि गवत खाऊ घालून पूजा करावी.
बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीराजाची पूजा केली जाते. पौराणिक कथांनुसार, बळी एक महान, दानशूर दैत्य राजा होता. त्याने भगवान विष्णूला त्रिलोकाचे दान केले होते. भगवान विष्णूने प्रसन्न होत त्याला वैकुंठाचे स्थान दिले. तसेच बळीला देवांप्रमाणे पूजन करण्याचा आशीर्वाद दिला.
बलिप्रतिपदा दानाचे महत्व शिकवते. बळीराज्याच्या दानाचे महत्त्व संपूर्ण धर्मग्रंथांमध्ये करण्यात आलेले आहे. या दिवशी दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते. भारताच्या अनेक भागांमध्ये बलिप्रतिपदा नववर्षाच्या रुपात साजरी केली जाते. याच दिवशी नव्या वर्षाची सुरुवात होते असे मानले जाते. लोक या दिवसापासून नव्या कामाची सुरुवात देखील करतात.
हिंदु ग्रंथांच्या मान्यतेनुसार, बलिप्रतिपदेच्या दिवशी राजा बळी आणि त्यांची पत्नी विंध्यवली यांच्या प्रतिमा तयार केल्या जातात. या प्रतिमा ५ वेगवेगळ्या रंगांमध्ये बनवून त्यांचे पूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या किंवा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बळीराजाची पूजा केली जाते.
दक्षिण भारतात ओणमदरम्यान बळीराजाची पूजा केली जाते.
> देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले आणि या युद्धात राक्षसांचा पराभव होऊ लागला.
> पराभूत राक्षस मृत आणि जखमी राक्षसांसह अस्तांचलला जातात आणि दुसरीकडे, राक्षस राजा बळी भगवान इंद्राच्या गडगडाटाने मारला जातो.
> यानंतर दानव गुरु शुक्राचार्य मृतांना जिवंत करण्याच्या त्यांच्या ज्ञानाने यज्ञ आणि इतर राक्षसांना जिवंत आणि निरोगी बनवतात.
> शुक्राचार्य राजा बळीसाठी यज्ञाचे आयोजन करतात आणि अग्नीतून दिव्य रथ, बाण आणि अभेद्य चिलखत मिळवतात.
> यामुळे राक्षसांची शक्ती वाढते.
> यानंतर इंद्र भगवान विष्णूकडे जातो. भगवान विष्णू आपल्या मदतीचे आश्वासन देतात आणि माता अदितीच्या पोटातून वामनाच्या रूपात जन्म घेण्याचे वचन देतात.
> बळीराजाच्या पराभवानंतर, कश्यप ऋषींच्या आज्ञेनुसार, माता अदिती पुत्राच्या जन्मासाठी असलेल्या पयोव्रताचा विधी करते.
> यानंतर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी दिवशी भगवान विष्णू माता अदितीच्या गर्भातून प्रकट होतात आणि ब्रह्मचारी ब्राह्मणाचे रूप धारण करतात.
> वामन स्वरूपातील भगवान विष्णू एका पायरीवर स्वर्गाचे मोजमाप करतात आणि पृथ्वी दुसऱ्या चरणात मोजतात. वामनाचा तिसरा पाय ठेवायला जागा कुठून मिळणार?
> अशा स्थितीत राजा बळी देवासमोर डोकं ठेवतो आणि म्हणतो की तू माझ्या मस्तकावर तिसरा पाय ठेवावा. भगवान वामन अगदी तेच करतात आणि बळीला पाताळात धाडतात.
> जेव्हा बळीने आपले वचन पाळले तेव्हा भगवान विष्णू प्रसन्न होतात. त्यानंतर ते बळीराजाला वरदान मागायला सांगितात. बळीराजा रात्रंदिवस देवासमोर राहण्याचे वचन मागतो.
> आपले वचन पाळत भगवान विष्णू पाताळलोकातील राजा बळीचे द्वारपाल होण्याचे स्वीकारतात.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.