इस्लाम धर्मातील महत्वाच्या सणांमध्ये प्रामुख्याने बकरी ईदचा समावेश होतो. बकरी ईदलाच 'बकरीद ईद' किंवा 'ईद-उल-अजहा' असे म्हटले जाते. बकरी ईद त्याग आणि समर्पणाचा सण समजला जातो. हा सण इस्लामिक कॅलेंडरनुसार शेवटच्या महिन्यात म्हणजेच जु-उल-हज्जामध्ये साजरा केला जातो. येत्या 17 जून 2024 रोजी देशभरात मुस्लिम बांधवांमार्फत बकरी ईदचा सण साजरा केला जाणार आहे.
इस्लाम धर्मामध्ये पैगंबर हजरत इब्राहिम यांना अल्लाहचे प्रेषित मानले जाते. त्यांना इस्लाममध्ये प्रचंड महत्व आहे. इस्लामिक मान्यतेनुसार, एके दिवशी अल्लाहने पै.हजरत इब्राहिम यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यानुसार अल्लाहने त्यांना आपल्या मुलाची कुर्बानी देऊन समर्पित करायचा आदेश दिला. अल्लाहच्या या आदेशाने ते पेचात सापडले. कारण एकीकडे अल्लाहचा हुकूम आणि दुसरीकडे आपल्या प्राणापेक्षा प्रिय आपला मुलगा. शेवटी हजरत इब्राहिम यांनी आपल्या मुलाची कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला. त्यांना ते डोळ्यांनी पाहणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून कठोर मनाने कुर्बानी दिली. मात्र ज्यावेळी त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्यासमोर धडधाकट उभा होता. आणि मुलाच्या जागी एक बकऱ्याची कुर्बानी झाली होती. हा चमत्कारसुद्धा अल्लाहनेच केला होता. या मान्यतेनुसार बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथा सुरू झाली.
मुस्लिम बांधव ईदच्या दिवशी एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण करून आपला सण साजरा करतात. त्यानंतर शीर खुरमा आणि बिर्याणीवर ताव देतात.मात्र बरेच लोक कामानिमित्त बाहेर असतात किंवा ज्यांना एकत्र येणे शक्य नसते, अशावेळी हे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन आपला सण साजरा करू शकतात.शिवाय तुम्ही स्वतः ईदनिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश शेअर करून आनंद साजरा करु शकता. तसेच आपल्या कॉलेजमधील, ऑफिसमधील मुस्लिम बांधवाना शुभेच्छारुपी संदेश पाठवून त्यांच्या आनंदात सहभागी होता येईल. आज आपण अशाच काही सुंदर शुभेच्छा पाहणार आहोत.
१) धर्म जात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची...
एकमेकांची गळाभेट घेऊन देऊयात शुभेच्छा बकरी ईदची
२) अल्लाह ताला पूर्ण करू तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद, सुखसमृद्धी नांदो हीच आमची सदिच्छा... बकरी ईद मुबारक
३) बंधुत्वाचा संदेश देऊया,
विश्वबंधुत्व वाढीस लावूया,
बकरी ईदच्या दिवशी हीच धरुनी मनी इच्छा,
बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा
४) तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो,
तुमचा प्रत्येक दिवस ईदपेक्षा कमी नसो,
सर्वांना बकरीद ईदच्या मनापासून शुभेच्छा
५) ईद घेऊन येई आनंद,
जोडू मनाशी मनाचे नवे बंध,
सणाचा हा दिवस खास..
बकरी ईद मुबारक तुम्हां सर्वांस
६) )बकरी ईदनिमित्त तुम्हा सर्वांस उत्तम आरोग्य,
सुख-ऐश्वर्य लाभो हीच सदिच्छा
बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा