Bail Pola Wishes : जिवा-शिवाची बैल जोडं... पोळा आणि पिठोरी अमावस्यानिमित्त पाठवा हे खास शुभेच्छा संदेश
मराठी बातम्या  /  धर्म  /  Bail Pola Wishes : जिवा-शिवाची बैल जोडं... पोळा आणि पिठोरी अमावस्यानिमित्त पाठवा हे खास शुभेच्छा संदेश

Bail Pola Wishes : जिवा-शिवाची बैल जोडं... पोळा आणि पिठोरी अमावस्यानिमित्त पाठवा हे खास शुभेच्छा संदेश

Sep 02, 2024 11:46 AM IST

Bail Pola And Pithori Amavasya 2024 Wishes : महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सांगता बैल पोळा व पिठोरी अमावस्येने होते. शेतकर्‍यांचा सर्जा राजा अर्थात बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करून बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. बैल पोळा आणि पिठोरी अमावस्या निमित्त हे शुभेच्छा संदेश ठरतील खास, वाचा आणि पोस्ट करा.

बैल पोळा आणि पिठोरी अमावस्येच्या शुभेच्छा
बैल पोळा आणि पिठोरी अमावस्येच्या शुभेच्छा

आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी पूर्वीची अवजारे आणि बैलांचे महत्व अजूनही कायम आहे. शेतकर्‍यासोबत वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.

पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. बैल पोळ्याच्या दिवशी बैलाला सजवले जाते आणि त्यांना खाण्यासाठी गोडधोड केले जाते. या दिवशी पुरणपोळीचा खास बेत केला जातो. सोमवार २ तारखेला पिठोरी अमावस्येला बैल पोळा सण साजरा करण्यात येईल. या दिवशी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत हे शुभेच्छा पाठवून सणाचा उत्साह वाढवूया.

बैल पोळ्याच्या शुभेच्छा

शिंगे घासली, बाशिंगे लावली,

माढुळी बांधली,म्होरकी आवरली,

तोडे चढविले, कासारा ओढला,

घुगुंरमाळा वाजे खळाखळा,

आज सण आहे बैल पोळा,

बैलपोळाच्या शुभेच्छा!

भारताच्या कृषी संस्कृतीचे महापर्व

म्हणजे आपला लाडका बैल,

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

जसे दिव्याविना वातीला,

आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,

तसेच कष्टाविना मातीला,

आणि बैलाविना शेतीला नाही पर्याय,

बैल पोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा!

झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं…,

तिफन,कुळव,शिवाळ,

शेती अवजारांचा आज थाट,

औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात,

शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा!

बाकदार पाठीवरती

झूल मखमली बसवा

गळ्यात घंटणी माळा

पायात घुंगरांच्या वाळा

आज आहे सण पोळा

सर्जा राजाला ओवाळा

बैलपोळाच्या हार्दिक शुभेच्छा

आला रे आला बैल पोळा आला,

गाव झालं सारं गोळा,

सर्जा राजाला घेऊन जाऊया,

सगळे राऊळा,

बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

जिवा शिवाची बैल जोड,

आला त्यांचा सण खास,

बैल पोळ्याच्या शुभेच्छा !

मखमली झुली रंगीत शिंगे,

कपाळी बांधली रेशीम बाशिंगे

धवळ्या पवळ्या सजले-धजले

गावभर बघा मिरवू लागले

आजच्या दिनी नाही कामधाम

पुरणपोळी खाऊन मस्त आराम

बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा

पिठोरी अमावस्येच्या शुभेच्छा

पिठोरी अमावस्या

दिन आनंदाचा आज

मातृदिनाचे महत्व

लेवू संस्कारांचा साज

पिठोरी अमावस्येच्या शुभेच्छा

जय देवी पिठोरी माता प्रसन्न

पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी

देवी पार्वतीने सांगितलेल्या

पिठोरी अमावस्या व्रत पूजनाच्या

मंगलमय शुभेच्छा

श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारच्या आणि

पिठोरी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा

Whats_app_banner