राम मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. सर्वीकडे राममय वातावरण निर्माण झाले आहे. श्रीराम लिहीलेले केशरी झेंडे व रामाचे पोस्टर सर्वीकडे लावण्यात आले आहे. हा सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे. असे सांगितले जात आहे की भूकंप जरी आला तरी राम मंदिरावर काहीही परिणाम होणार नाही, असे का? जाणून घ्या सविस्तर माहिती.
वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांनी राम मंदिराचे डीजाइन तयार केले आहे. श्रीरामाचे अयोध्येतील मंदिर असे तयार करण्यात आले आहे की २५०० वर्षापर्यंत येथे भूकंपाचे झटके पण राम मंदिरावर काहीच परिणाम करणार नाही. वास्तुकार चंद्रकांत सोमपुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिर नागर शैलीचे बनवले गेले आहे. मंदिराचा गर्भगृह अष्टकोनी आहे, जे भगवान विष्णूच्या ८ रूपांचे प्रतिक आहे.
अयोध्या राम मंदिर बनवताना उत्तर आणि मध्य भारताच्या नागर शैली वास्तुकलेचा उपयोग करण्यात आला आहे. राम मंदिर बनवण्यासाठी मकराना नावाच्या दगडाचा वापर करण्यात आला आहे. हा मौल्यवान आणि जुना दगड असून, या दगडाचा वापर करून गर्भगृहात सिंहासन तयार करण्यात आले आहे, येथे श्रीराम विराजमान होतील.
मंदिराचे गर्भगृह २०×२० फीट अष्टकोनी आकाराचे असून संरचनेचा परीघ गोलाकार आहे. जे भगवान विष्णूच्या ८ रूपांचे प्रतिनिधीत्व करते. मंदिरात ५ मंडप आहे.
मंदिराची कॉरिडोर सोबत लांबी व रुंदी ६०० मीटर इतकी आहे. राम मंदिर हे ३२० फुट लांब, २५० फुट रुंद आणि १६१ फुट उंच आहे. तसेच मंदिरात १ कळस आहे.
मंदिरात भगवान शंकर, माता पार्वती, गणपती, भगवान विष्णू आणि हनुमानाची प्रतिमा आहे.
नागर शैली एक प्रसिद्ध शैली असल्यामुळे राम मंदिर बनवताना या शैलीचा वापर करण्यात आला आहे. वास्तुविशारद चंद्रकांत सोमपूर यांच्यानुसार हे मंदिर भारतातील सर्वात मोठे आहे.
मंदिरात जेथे रामजन्म झाला होता तिथेच रामाची ही मूर्ती स्थापन करण्यात येत आहे. मंदिरात पाच घुमट व १६१ फुट उंचीचा एक बुरुंज आहे. मंदिरा मध्ये एकूण ३६० खांब आहेत.
आयआयटी रुडकीतर्फे २५०० वर्षापर्यंत भूकंपाचा परिणाम होणार नाही यासाठी काही बदल सुचविण्यात आले होते. त्यामुळे मंदिर असे बनविण्यात आले आहे की २५०० वर्षापर्यंत भूकंपाचा परिणाम होणार नाही.
रामाच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडू शकतील याकरिता तीन मजल्यांच्या मंदिरात मध्यभागी गर्भगृह आहे. हे मंदिर असे तयार केले गेले आहे की, रामनवमीला सूर्य किरणांनी रामाच्या मूर्तीवर सूर्यटिळा होईल.