Shivratri : उद्या मासिक शिवरात्री; पूजेसाठी हे चार प्रहर महत्वाचे, जाणून घ्या पूजेची वेळ
मराठी बातम्या  /  धर्म  /  Shivratri : उद्या मासिक शिवरात्री; पूजेसाठी हे चार प्रहर महत्वाचे, जाणून घ्या पूजेची वेळ

Shivratri : उद्या मासिक शिवरात्री; पूजेसाठी हे चार प्रहर महत्वाचे, जाणून घ्या पूजेची वेळ

Aug 01, 2024 02:27 PM IST

Shivratri August 2024 Date : ज्योतिष शास्त्रात भगवान शिवाला समर्पित शिवरात्रीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी शिवाची आराधना करून त्यांचा जलाभिषेक केल्यास तसेच, प्रहरामध्ये त्यांची पूजा केल्यास फार लाभ होतो, असे मानले जाते.

ऑगस्ट २०२४ मासिक शिवरात्री
ऑगस्ट २०२४ मासिक शिवरात्री

Masik Shivratri August 2024 Date and Puja Muhurat : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशी तिथीला शिवरात्रीचे व्रत करण्यात येते. प्रत्येक महिन्याला केल्या जाणाऱ्या या व्रताचे विशेष महत्त्व आहे. आषाढ महिना संपून श्रावण महिना सुरू होत आहे त्याआधी येणाऱ्या या शिवरात्रीला खास महत्व आहे. प्रत्येक तिथीला वेगळे महत्त्व असते. शिवरात्रीचा मासिक सण हिंदू कॅलेंडरमध्ये कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. मासिक शिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी खूप खास असतो. या दिवशी शिवाची पूजा करून त्यांचा जलाभिषेक केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. या दिवशी शिवमंदिरांमध्ये विधीनुसार शिवाची पूजा करण्यासाठी भाविकांची गर्दी असते.

चतुर्दशी तिथी वेळ : 

मासिक शिवरात्री २ ऑगस्ट रोजी आहे. चतुर्दशी तिथी २ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी सुरू होईल, तर ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी समाप्त होईल.

शिवरात्रीचे व्रत सोडण्यासाठी शुभ मुहूर्त: 

मासिक शिवरात्रीचे व्रत ३ ऑगस्ट २०२४ रोजी सोडले जाईल. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजून ४३ मिनिटे ते दुपारी ३ वाजून ४८ मिनिटापर्यंत उपवास सोडण्याचा शुभ मुहूर्त असेल.

धार्मिक शास्त्रानुसार महाशिवरात्रीची पूजा चार प्रहरमध्ये करतात. या चार प्रहरात पूजा केल्यामुळे धर्म, धन, काम आणि मोक्ष प्राप्त होतो.

चार प्रहरांमध्ये शिवाची पूजा करा-

रात्री प्रथम प्रहर पूजा वेळ - संध्याकाळी ७:१० ते रात्री ९:४८

रात्रीची दुसरी प्रहर पूजा वेळ - संध्याकाळी ९:४८ ते ३ ऑगस्ट अर्धरात्रौ १२:२७

रात्री तृतीया प्रहर पूजा वेळ - अर्धरात्रौ १२:२७ ते ३:५, ३ ऑगस्ट

रात्री चतुर्थ प्रहर पूजा वेळ - अर्धरात्रौ ३:५ ते पहाटे ५:४३, ३ऑगस्ट

शिवरात्रीचे व्रत करण्याची पद्धत-

शिवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजे त्रयोदशी तिथीला भक्तांनी एकदाच भोजन करावे. या दिवशी सकाळी उठून स्नान करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी स्नान करूनच भक्तांनी पूजा करावी किंवा मंदिरात जावे. रात्रीच्या वेळी शंकराची पूजा करणे उत्तम मानले जाते. यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ करून उपवास सोडावा. चतुर्दशी तिथीच्या सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दरम्यान उपवास संपवावा.

त्यासोबतच "ॐ नमः शिवाय" या मंत्राचा तीन वेळा माळ जप करा. सोबत "मृत्युंजय मंत्र" ची एक माळ जप देखील करा. या पूजेसह शिवाचं ध्यान नक्की करा. महाशिवरात्रीला चार प्रहारात पूजा केल्यास तुमचं आयुष्य बदलून जाईल.

Whats_app_banner