August Festival List : ऑगस्ट महिन्यातील सण-उत्सवांची यादी, श्रावणमासारंभासह अनेक खास व महत्वाचे व्रत वैकल्य
मराठी बातम्या  /  धर्म  /  August Festival List : ऑगस्ट महिन्यातील सण-उत्सवांची यादी, श्रावणमासारंभासह अनेक खास व महत्वाचे व्रत वैकल्य

August Festival List : ऑगस्ट महिन्यातील सण-उत्सवांची यादी, श्रावणमासारंभासह अनेक खास व महत्वाचे व्रत वैकल्य

Jul 31, 2024 05:19 PM IST

August 2024 San Utsav : जुलै महिना संपून ऑगस्ट महिना सुरू होत आहे. ऑगस्ट महिन्यातच श्रावणमासारंभ होत असून, व्रत वैकल्याच्या दृष्टीकोनातून संपूर्ण महिना महत्वाचा आणि खास ठरणार आहे. जाणून घ्या ऑगस्ट महिन्यातील सण-उत्सवांची यादी.

ऑगस्ट महिन्यातील सण-उत्सवांची यादी
ऑगस्ट महिन्यातील सण-उत्सवांची यादी

जुलै महिन्याची सांगता होत असून, ऑगस्ट महिना प्रारंभ होत आहे. यंदाचा ऑगस्ट महिना सण-उत्सवाच्या बाबतीत फार खास ठरणार आहे. कारण याच महिन्यात श्रावण मासारंभ होत असून, श्रावण महिना हा व्रत-वैकल्यांनी भरलेला असतो. वेळेवर सुट्टीची अडचण होऊ नये म्हणून, जाणून घ्या ऑगस्ट महिन्यातील सर्व सण-उत्सवांच्या तारखा आणि वार.

ऑगस्ट २०२४ मधील सण-उत्सवांची संपूर्ण यादी

गुरुवार १ ऑगस्ट - प्रदोष व्रत, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यातिथी

शुक्रवार २ ऑगस्ट - शिवरात्री, संत नामदेव महाराज पुण्यतिथी

शनिवार ३ ऑगस्ट - संत सावता माळी पुण्यतिथी, अमावस्या प्रारंभ दुपारी ३.५०

रविवार ४ ऑगस्ट - दर्शअमावस्या , दीपपूजा, गटारी अमावस्या समाप्ती सायं.४.४२

सोमवार ५ ऑगस्ट - श्रावण मासारंभ, चंद्रदर्शन, श्रावणी सोमवार शिवपूजन शिवामूठ : तांदूळ

मंगळवार ६ ऑगस्ट - मंगळागौरी पूजन

गुरुवार ८ ऑगस्ट - विनायक चतुर्थी, नागचतुर्थी उपवास, बृहस्पती पूजन, दूर्वागणपती व्रत

शुक्रवार ९ ऑगस्ट - नागपंचमी, जागतिक आदिवासी दिन

शनिवार १० ऑगस्ट - कल्की जयंती

रविवार ११ ऑगस्ट - आदित्य पूजन

सोमवार १२ ऑगस्ट - श्रावणी सोमवार शिवपूजन शिवामूठ - तीळ

मंगळवार १३ ऑगस्ट - दुर्गाष्टमी, मंगळागौरी पूजन

बुधवार १४ ऑगस्ट - पतेती

गुरुवार १५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन, पारशी नूतनवर्ष १३९४ प्रारंभ

शुक्रवार १६ ऑगस्ट - पुत्रदा एकादशी, वरदलक्ष्मी व्रत

शनिवार १७ ऑगस्ट - शनिप्रदोष

सोमवार १९ ऑगस्ट - नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन

गुरुवार २२ ऑगस्ट - संकष्ट चतुर्थी चंद्रोदय 09.02

शुक्रवार २३ ऑगस्ट - राष्ट्रीय अंतराळ दिन

सोमवार २६ ऑगस्ट - श्रीकृष्ण जयंती

मंगळवार २७ ऑगस्ट - गोपाळकाला

गुरुवार २९ ऑगस्ट - अजा एकादशी

शनिवार ३१ ऑगस्ट - शनिप्रदोष

महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार, ५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत श्रावण महिना असेल. तर उत्तर भारतात २२ जुलै रोजी श्रवण नक्षत्र, प्रीती आणि सर्वार्थ सिद्धी योगावर श्रावण मास सुरू झाला आहे. श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारची पूजा केल्यास तिचं विशेष फळ मिळतं असं मानलं जातं. या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते.

श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथी आणि वाराला महत्व आहे.

Whats_app_banner