ज्योतिषशास्त्रात राशीभविष्य, अंकशास्त्र, वास्तूशास्त्राप्रमाणे रत्नशास्त्राला देखील विशेष महत्व आहे. रत्नशास्त्रातदेखील माणसाच्या प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी रत्न सुचविण्यात आले आहेत. मात्र कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण हे रत्न राशीनुसार धारण करणे योग्य असते. शिवाय रत्न धारण केल्याने कुंडलीतील ग्रहदोषसुद्धा दूर होण्यास मदत होते. रत्न हातात घातल्याने सकारात्मक बदल घडून येतात. शिवाय आर्थिक स्थिती सुधारते. परंतु योग्य व्यक्तीसाठी योग्य रत्न निवडणे गरजेचे असते.
रत्न शास्त्रानुसार एकूण ८४ रत्ने यामध्ये उपलब्ध आहेत. मात्र यातील केवळ ९ रत्ने प्रमुख आहेत. इतर सर्व त्या रत्नांची उपरत्ने आहेत. त्यामुळे या ९ रत्नांना विशेष महत्व आहे. रुबी, मोती, लाल कोरल, पन्ना, पिवळा नीलम, डायमंड, निळा नीलम, हॅसोनाईट आणि मांजरी नेत्र. ही नऊ रत्ने अस्तित्वात आहेत. या रत्नाच्या आधारे मनुष्याचे अनेक दोष दूर होतात.
काही वेळा लोक एका वेळी दोन रत्ने धारण करतात. असे करणे कितपत योग्य असते हे आज आपण जाणून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार, एका वेळी दोन रत्ने धारण करण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र कोणतेही रत्न कोणत्याही रत्नांसोबत धारण करणे योग्य नसते. ज्योतिष अभ्यासानुसार काही ठराविक रत्नेच एकत्र धारण केल्याने लाभ मिळतो. मात्र कोणतेही रत्न कोणत्याही रत्नांसोबत घातल्याने दुष्परिणाम सहन करावे लागतात. त्यामुळेच ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही रत्न एकत्र धारण करू नका. आज आपण गोमेद आणि नीलम रत्न एकत्र धारण करणे शुभ कि अशुभ याबाबत जाणून घेणार आहोत.
रत्नशास्त्रात गोमेद या रत्नाला राहुचे रत्न म्हटले जाते. हे रत्न धारण केल्याने राहू दोष दूर होतो अशी मान्यता आहे. वृषभ, कन्या, कुंभ, तूळ आणि मकर राशीच्या लोकांनी गोमेद घालण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात देण्यात आला आहे. शिवाय नीलमसोबत गोमेद हे रत्न धारण करणे शुभ असते. या दोघांच्या एकत्र धारण करण्याने अनेक आर्थिक लाभ होतात. शिवाय ग्रहदोष दूर व्हायला मदत होते.
जर एखाद्या व्यक्तीच्या राशीत शनि खालील घरात म्हणजेच सहाव्या, आठव्या आणि बाराव्या घरात नसेल तर त्या व्यक्तीने हे रत्न धारण करावे. गोमेद हे रत्न नेहमीच चांदीच्या अंगठीत किंवा पेंडेंटमध्ये धारण करणे लाभदायक असते. शिवाय हे रत्न आर्द्रा, शतभिषा किंवा स्वाती नक्षत्रात धारण करणे शुभ असते. गोमेद धारण करण्यापूर्वी शुक्रवारच्या दिवशी गंगाजल, दूध आणि मधाच्या मिश्रणात घालून ठेवावे. शनिवारी अंघोळीनंतर हे रत्न स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. त्यांनंतर 'ऊँ रां राहवे' या मंत्राचा १०८ वेळा जप करत मधल्या बोटात ही अंगठी धारण करावी.
रत्न शास्त्रानुसार नीलम नेहमी चांदीच्या किंवा व्हाईट गोल्डच्या धातूमधूनच धारण करावा. नीलम कधीही सोन्यात धारण करू नये. शनिवारच्या दिवशी पहाटे ५ ते ९ पर्यंत. किंवा सायंकाळी ५ ते ७ याकाळात नीलम धारण करणे शुभ असते. नीलम रत्न धारण करण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या. पुरुषांनी उजव्या हाताच्या बोटात हे रत्न घालावे. तर महिलांनी कोणत्याही हाताच्या बोटात हे रत्न धारण करणे शुभ असते. रत्न धारण करण्यापूर्वी ते गंगाजल आणि गाईच्या कच्च्या दुधात घालून ठेवावे. आणि नंतर पुसून घेऊन धारण करावे. शिवाय 'ऊँ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करून नीलम धारण करावे.