आजकाल बहुतांश लोकांच्या घरात मनी प्लांट पाहायला मिळते. मनी प्लांटला धन आकर्षित करणारे रोपटे असे संबोधले जाते. वास्तू शास्त्रातसुद्धा मनी प्लांट घरात लावणे शुभ आणि सकारात्मक समजले जाते. त्यामुळे अनेक लोक मनी प्लांट आपल्या घरात आणून लावतात. अशी मान्यता आहे की, मनी प्लांट आपल्या घरात लावल्याने घरात आर्थिक बाबींची कमतरता भासत नाही. घरात सुखसमृद्धी राहते. शिवाय असेही म्हटले जाते की, आपल्या घरातील मनी प्लांट जितका हिरवा, घनदाट आणि पसरलेला असतो तितकीच त्या व्यक्तीची संपत्ती वाढते. याशिवाय घरात मनी प्लांट लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते.
ज्योतिषशास्त्रानुसार, मनी प्लांट आपल्या घरात लावल्याने घरातील अनेक प्रकारचे वास्तू दोषही दूर होतात. मात्र, फक्त मनी प्लांट लावणे पुरेसे नाही.तर वास्तू शास्त्रानुसार मनी प्लांट लावण्याचे काही खास नियम सांगण्यात आले आहेत. जेणेकरून त्याचा चांगला लाभ आपल्याला व्हावा. वास्तू शास्त्रानुसार मनी प्लांटमध्ये फक्त एक गोष्ट ठेवली तर माणसाला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. आज आपण मनी प्लांटबाबत काही खास वास्तु नियम जाणून घेणार आहोत.
अनेकजण मनी प्लांट घरी आणून इंटेरिअरनुसार कोणत्याही दिशेला लावतात. मात्र वास्तू शास्त्रानुसार असे करणे अत्यंत चुकीचे आहे. शास्त्रात मनी प्लांट ठेवण्यासाठी दिशा निश्चित करण्यात आली आहे. त्या दिशेलाच प्लांट ठेवल्याने मनासारखा लाभ प्राप्त होतो. शास्त्रानुसार मनी प्लांट उत्तर किंवा पूर्व दिशेत ठेवणे अत्यंत शुभ असते. कारण उत्तर दिशेला कुबेर देवाची दिशा म्हटले जाते. पूर्व दिशासुद्धा धन आकर्षित करते.
मनी प्लांट आर्थिक स्थिती तर मजबूत करतेच, शिवाय तुमच्या घरात सकारत्मक ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे घरातील वातावरण अगदी आनंदी आणि खेळीमेळीचे राहते. घरात धनधान्य आणि सुखसमृद्धी नांदते. वास्तू शास्त्रानुसार घरात धनधान्यात वाढ करायची असेल तर, मनी प्लांटमध्ये पिवळ्या किंवा लाल रंगाचा धागा सात वेळा गुंडाळून बांधणे लाभदायक ठरते. असे केल्याने तुमच्यावर शुक्र ग्रहाची कृपादृष्टी राहते. आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
वास्तू शास्त्रानुसार, मनी प्लांटच्या पानांवर हरभरा डाळ आणि गूळ लावून भगवान विष्णूला ते अर्पण करा. आणि नंतर तेच पान गौमातेला खाऊ घाला. किमान २१ गुरुवारपर्यंत हा उपाय करावा. असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची कृपादृष्टी लाभते. शिवाय तुमच्या संपत्तीतही वाढ होते.
संबंधित बातम्या