अनेकवेळा असे घडते की आयुष्यात काहीही चुकीचे केलेले नसतानाही विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. भूतकाळातील कर्माच्या प्रभावामुळे अशा गोष्टी घडत असतात, असे म्हणतात.
अशा परिस्थितीत जर तुम्ही कोर्टाच्या प्रकरणांमध्ये अडकले असाल किंवा अशा खटल्यांमध्ये तुमच्या बाजूने यश मिळवायचे असेल तर तुम्ही येथे दिलेले ज्योतिष उपाय अवश्य करावेत. या उपायांतून तुम्हाला यश मिळू शकते.
न्यायालयीन खटल्यात यश मिळवण्यासाठी खटल्याच्या दिवशी खिशात तांदूळ घेऊन घराबाहेर पडावे. तसेच ज्या ठिकाणी तुमची केस सुरू आहे त्या ठिकाणी थोडा तांदूळ ठेवावा, पण हा उपाय करताना लक्षात ठेवा की, असे करताना तुम्हाला इतर कोणत्याही व्यक्तीने पाहू नये.
न्यायालयीन खटल्यातून सुटका होण्यासाठी कोणत्याही दुर्गा मंदिरात जा, तिथे एक श्रीफळ लाल कपड्यात गुंडाळून घ्या आणि तुमची इच्छा सांगताना तिथे ठेवा. असे केल्याने तुम्हाला न्यायालयीन खटल्यातून तात्काळ मुक्ती मिळेल. तुम्हाला आईचा आशीर्वादही मिळेल.
जर तुम्ही कोणतीही चूक नसतानाही कायदेशीर प्रकरणात अडकला असाल तर शनिवारी विहित पद्धतीनुसार शनिदेवाची पूजा करावी. तसेच दर शनिवारी काळ्या गाईला हिरवा चारा द्यावा. याशिवाय मोहरीच्या तेलात बनवलेली पुरी शनिवारी कावळ्यांना खाऊ घालावी. असे केल्याने तुम्हाला कोर्ट केसेसमध्ये यश मिळेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)