ज्योतिषशास्त्रानुसार, अवकाशात नवग्रह कार्यरत असतात. या नऊ ग्रहांचा मानवी आयुष्यावर विशेष प्रभाव दिसून येतो. नऊ ग्रहांपैकी सूर्याला ग्रहांचा राजा म्हणून संबोधले जाते. सूर्यदेवाच्या कृपेनेच माणसाच्या आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होते. वैदिक शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य ग्रह मजबूत असेल त्या व्यक्तीला आयुष्यात सुख, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळते. परंतु एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमजोर असेल किंवा अशुभ असेल तर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
सूर्यदेवाची शुभ कृपादृष्टी मिळण्यासाठी आणि कुंडलीत सूर्यदेवाचे स्थान मजबूत ठेवण्यासाठी शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच एक उपाय म्हणजे शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा करणे होय. शिवाय पूजेसोबतच आणखी काही गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. वैदिक शास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या रविवराच्या दिवशी करणे अशुभ समजले जाते. रविवारी या गोष्टी केल्याने घरात दारिद्र्य तर येतेच शिवाय अनेक गोष्टींमध्ये नुकसान सहन करावा लागतो. पाहूया या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत.
रविवारच्या दिवशी पश्चिम आणि वायव्य दिशेला दिशा शूल असते. त्यामुळे रविवारच्या दिवशी या दिशेला प्रवास करणे टाळा. मात्र प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर घरातून बाहेर पडताना खाऊचे पान, लापशी किंवा तूप खाऊनच बाहेर पडा. रविवारच्या दिवशी चुकूनसुद्धा तांब्याच्या वस्तू किंवा सूर्यदेवाशी संबंधित वस्तूंची विक्री करु नये.
असे झाल्यास कुंडलीत सूर्यदेवाची स्थिती कमजोर होते. आणि त्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक नुकसानसुद्धा होते. तसेच रविवारच्या दिवशी काळ्या, निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळा. रविवारी या रंगाचे कपडे परिधान केल्याने सूर्यदेवाची स्थिती कमजोर होते. याउलट लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने कुंडलीत सूर्यदेवाची स्थिती मजबूत होते. वैदिक शास्त्रानुसार मांसाहारी भोजन करणे टाळा. त्यामुळे कुंडलीतील सूर्याची स्थिती बिघडते. रविवारच्या दिवशी शुद्ध शाकाहारी आणि सात्विक भोजन करावे.
संबंधित बातम्या