अनेकदा लोक हात, पाय आणि गळ्यात काळा धागा बांधतात. पण तुम्हाला माहित आहे का की हात, पाय आणि मानेवर काळा धागा का बांधला जातो? चला, तर मग त्याबद्दल आपण येथे सविस्तर जाणून घेऊया.
लाल किताबानुसार शनिवार काळा धागा घालण्यासाठी शुभ दिवस आहे. डाव्या पायावर काळा धागा बांधणे शुभ मानले जाते.
पायांवर काळा धागा धारण केल्याने शनिदोषापासून आराम मिळतो, असे मानले जाते. तसेच नकारात्मक परिणामही संपतात. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो.
पायात काळा धागा धारण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि व्यवसायातील अडचणी दूर होतात.
हातपायांवर काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून बचाव होतो.
याशिवाय व्यक्तीच्या आयुष्यात येणारे संकट टळतात.
लाल किताबानुसार मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी काळा धागा बांधू नये. या दोन्ही राशींचा स्वामी मंगळ आहे, ज्याचा रंग लाल आहे. मंगळाचा काळ्या रंगाचा तिरस्कार आहे असे मानले जाते. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना काळा धागा बांधल्याने जीवनात वाईट परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
काळा धागा घालण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
काळा धागा धारण करताना रुद्र गायत्री मंत्राचा जप करा 'ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्.' जप करावा.
शरीराच्या ज्या भागात काळा धागा बांधणार आहात, तेथे दुसरा कोणताही धागा नसावा.
काळ्या धाग्यात ९ गाठी बांधल्यानंतरच ते परिधान करावे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े
संबंधित बातम्या