मराठी बातम्या  /  religion  /  Astro Tips For Stubborn Kid : मुलांच्या चिडचिड करण्याच्या स्वभावाला आवर कसा घालाल?
तुमची मुलं चिडचिड करतात का
तुमची मुलं चिडचिड करतात का (Freepik)

Astro Tips For Stubborn Kid : मुलांच्या चिडचिड करण्याच्या स्वभावाला आवर कसा घालाल?

22 May 2023, 12:57 ISTDilip Ramchandra Vaze

ज्योतिषशास्त्रात सांगितल्या प्रमाणे मुलांच्या अशा चिडचिड करण्याच्या स्वभावाला काही उपाय आहेत. हे उपाय सलग एक महिना केल्यास त्याचे फळ तुम्हाला पाहायला मिळेल.

अलिकडच्या काही काळात मुलं अत्यंत हट्टीपणा करताना पाहायला मिळतात. त्यांच्या वयानुसार त्यांच्या स्वभावाकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र कधीकधी मुलं इतकी चिडचिड करतात की त्यांच्या रागाला काही थारा राहात नाही. मग त्यांच्या या रागाकडे आपण लक्ष देऊ लागतो मात्र या रागाला कसा आवर घालायचा हे मात्र आपल्याला समजत नाही. ज्योतिषशास्त्रात सांगितल्या प्रमाणे मुलांच्या अशा चिडचिड करण्याच्या स्वभावाला काही उपाय आहेत. हे उपाय सलग एक महिना केल्यास त्याचे फळ तुम्हाला पाहायला मिळेल.

ट्रेंडिंग न्यूज

कोणता उपाय कराल?

अर्धा किलो गव्हाचं पीठ आणि अर्धा किलो साखरेची पावडर घ्या. यांना एकत्र करा आणि त्यांना एकजिव करा. आता हे मिश्रण तुमच्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवा. असं केलयानंतर हे पीठ कोणत्याही झाडाच्या मुळाशी असलेल्या मुंग्यांना खाऊ घाला. मुंग्यांना पीठ खायला घालणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे.

हा उपाय कधी करावा?

दर शुक्रवारी हा उपाय करावा आणि ११ शुक्रवार हा उपाय सुरू ठेवावा. मुलाच्या हट्टी आणि रागीट स्वभावापासून मुक्त होण्यासाठी हा रामबाण उपाय मानला जातो.

फक्त मुंगीलाच का खायला द्यावं?

धार्मिक मान्यतेनुसार, मुंगीला कीटकांच्या श्रेणीमध्ये नकारात्मक प्राणी म्हणून पाहीलं गेलं आहे. त्यामुळे तुम्ही या नकारात्मक प्राण्याला जितके जास्त खायला द्याल, तितकी तुमच्या मुलाच्या शरीरातून नकारात्मकता दूर होईल आणि त्याच्या स्वभावात चमत्कारिक बदल दिसून येतील. ११ शुक्रवार हे उपाय केल्यास तुमचं मूल तुमची आज्ञा पाळायला सुरूवात करेल. त्याचा चिडचिडेपणा नष्ट होईल.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग