जीवन जगत असताना व्यक्तींच्या आयुष्यात अनेक चढ उतार येत असतात. पण व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचे पालन केल्यास व्यक्तीच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत होते.
या ठिकाणी आपण व्यवसायात येणाऱ्या अडचणींपासून कशी मुक्ती मिळवायची? याचे उपाय पाहणार आहोत. चला तर मग व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी ज्योतिष शास्त्रात कोण-कोणते उपाय सांगितले आहेत, जे जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रात व्यवसायातील नुकसान टाळण्यासाठी आणि व्यवसायात प्रगती साधण्यासाठी उपाय सुचवले आहेत. याचे पालन केल्याने व्यवसायात वाढ होते आणि चांगला नफा होतो.
- जर तुम्हाला व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर थोडा कच्चा कापूस केशरमध्ये रंगवा. यानंतर संकट निवारक हनुमानाच्या मंत्राचा ११ वेळा जप करावा. आता हा कापूस दुकानात, कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधा. हा उपाय केल्यास व्यवसायात यश मिळते, अशी मान्यता आहे.
- भगवान कुबेर यांना धनाचे देवता मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान कुबेरांचे स्थान उत्तरेला आहे. त्यामुळे कुबेराची मूर्ती कामाच्या ठिकाणी उत्तर दिशेला ठेवा. असे केल्याने तुम्हाला व्यवसायात फायदा होईल आणि तोटाही कमी होईल.
- जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर मंगळवारी एक लिंबू आणि संपूर्ण देठासह हिरव्या मिरचीचा हार बनवा. हा हार व्यवसायाच्या ठिकाणी दारावर लटकवा. असे केल्याने व्यवसाय वाढेल असा विश्वास आहे.
-व्यवसाय सुरळीत चालत नसेल तर शनिवारी पिंपळाचे पान आणून तुम्ही बसता त्याठिकाणी उशी किंवा खुर्चीखाली ठेवा. यानंतर शनिदेवाचे ध्यान करा. हा उपाय सात शनिवार करा. प्रत्येक वेळी पिंपळाचे नवीन पान आणावे. यानंतर सात शनिवारचे सात पाने नदीत सोडून द्या. या उपायाचा अवलंब केल्यास व्यवसायात भरभरात येईल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)