हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पती अत्यंत पूजनीय आहेत. अशी मान्यता आहे की या झाडांची आणि वनस्पतींची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटं दूर होतात. वास्तूशास्त्रानुसार अशा वनस्पती घरात लावल्याने मानवी जीवनात शुभ फळ मिळते. आपण येथे अशाच झाडांची आणि वनस्पतींची माहिती घेणार आहोत, ज्यांना घरात स्थान दिल्याने तुम्हाला सुख, समृद्धी आणि संपत्तीचे शुभ फळ मिळेल.
अशोक वृक्ष हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय आहे. या झाडाची पाने बहुतेक वेळा धार्मिक विधींमध्ये वापरली जातात. अशोक वृक्षाला हिंदू धर्मात एक पवित्र वृक्ष मानले जाते. तसेच, त्याला अहिंसा वृक्ष असेही म्हणतात. तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल आणि संपत्ती टिकवायची असेल, तर अशोकाच्या पानांचा हा वास्तु उपाय जाणून घ्या.
१) अशोकाची पाने घरात ठेवल्याने लक्ष्मीची कृपा होते. शुक्रवारी ११ अशोकाची पाने लाल कपड्यात बांधून आपल्या घराच्या तिजोरीत ठेवावी. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.
२) अशोक वृक्षाचे मूळ धनप्राप्तीसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. शुभ मुहूर्तावर या झाडाची मुळे घरी आणा आणि त्याची मुळे स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडी करून घराच्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासणार नाही.
३) जर तुम्हाला व्यवसायात प्रगती हवी असेल तर अशोकाच्या पानांची माळ बनवून तुमच्या कार्यालयाच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगावी. असे केल्याने तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जाईल. यासोबतच व्यवसायात भरघोस नफाही मिळेल.
४) ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात रस नाही, त्यांनी अशोकाच्या पानांनी माता सरस्वतीची पूजा करावी. वास्तूनुसार, असे केल्याने त्यांची बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढते आणि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये चांगली नोकरी मिळण्यास मदत होते.
५) अशोकाच्या झाडाला रोज जल अर्पण केल्याने देवी भगवतीचा आशीर्वाद कायम राहतो. शास्त्रानुसार जे लोक नियमितपणे अशोकाच्या झाडाला जल अर्पण करतात, त्यांना मानसिक आजार, घरगुती वाद, कर्ज इत्यादी समस्यांपासून लवकर सुटका मिळते. यासोबतच अशोकाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.