मराठी बातम्या  /  religion  /  Ashadhi Wari 2023 : माहेराहून रुक्मिणी मातेची पालखी पंढरीच्या दिशेने, अमरावतीत भक्तीचं वातावरण
रुक्मिणी माता
रुक्मिणी माता (श्री क्षेत्र कौंडण्यपूर)

Ashadhi Wari 2023 : माहेराहून रुक्मिणी मातेची पालखी पंढरीच्या दिशेने, अमरावतीत भक्तीचं वातावरण

26 May 2023, 12:09 ISTDilip Ramchandra Vaze

Amravati Rukmini Mata Palkhi : अमरावतीचं कौंडण्यपूर आज एखाद्या उत्सवाप्रमाणे सजलेलं पाहायला मिळत आहे. २६ मे २०२३ च्या दुपारी ०३.०० वाजता माता रुक्मिणीची पालखी आपलं प्रस्थान ठेवेल.

विदर्भाची पुरातन राजधानी म्हणून कौडण्यपूरची ओळख आहे. कौंडण्यपूरची आणखी एक धार्मिक ओळख आहे. या स्थानाला माता रुक्मिणीचं माहेर म्हणूनही ओळख प्राप्त झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आता पंढरपूरच्या दिशेने पालख्यांचं मार्गक्रमण व्हायला सुरूवात झाली आहे. सकाळी संत गजानन महाराजांच्या पालखीनं पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. आता दुपारी रखुमाई विठ्ठलाच्या भेटीचं पहिलं पाऊल ठेवणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आज जेष्ठ शुक्ल सप्तमीचा दिवस असल्याने आज दूरवरून पंढरपूरला येणाऱ्या पालख्या प्रस्थान ठेवत आहेत. कौंडण्यपूरला विदर्भाची पंढरी या नावानेही ओळखलं जातं. यंदा या वारीचं ४२९वं वर्ष आहे आणि गेली ४२८ वर्ष ही वारी अव्याहतपणे पंढरपूरला रवाना होत आली आहे.

अमरावतीचं कौंडण्यपूर आज एखाद्या उत्सवाप्रमाणे सजलेलं पाहायला मिळत आहे. २६ मे २०२३ च्या दुपारी ०३.०० वाजता माता रुक्मिणीची पालखी आपलं प्रस्थान ठेवेल. या कार्यक्रमाला कौंडण्यपूर रुक्मिणी पीठाचे गुरू राजराजेश्वर माऊली सरकार, खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर उपस्थित राहाणार आहेत.

वाशिष्ठा नदीच्या काठावर असलेल्या या तीर्थक्षेत्राहून संत सदाराम महाराजांनी १५९४ साली वारीला प्रारंभ केला होता. माता रुक्मिणी मातेच्या माहेराहून निघालेली ही महाराष्ट्रातील पहिली पालखी मानली जाते.

 अमरावती जिल्ह्यातल्या बियाणी चौक इथं या पालखीचं भव्य स्वागत केलं जातं. गेली कित्येक वर्ष ही परंपरा कायम आहे.अमरावती शहराची कुलदेवी अंबादेवी मंदिर आणि एकवीरा मंदिर इथं ही पालखी मुक्कमी असते. त्यानंतर २७ मे रोजी सकाळी राजापेठ बस स्थानकाजवळही या पालखीची पूजा केली जाते आणि मग ही पालखी पुढे पंढरपूर इथं रवाना होते.

ही पालखी ४० दिवसांचा आणि जवळपास साडेसहाशे किमीचा प्रवास करून पंढरपूर इथं पोहोचते.

गजानन महाराजांच्या पालखीनेही केलं प्रस्थान 

पाच जिल्हे आणि तब्बल साडेसातशे किलोमीटरचा टप्पा पार करून तब्बल एक महीन्यांची मजल दरमजल करत पंढरीच्या विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शेगावचे संत गजानन महाराजांच्या पालखीनं आज प्रस्थान ठेवलं. 

 

विभाग