आषाढ महिन्यात योणारी एकादशी तिथी देवशयनी एकादशी आणि आषाढी एकादशी म्हणून ओळखली जाते. यादिवशीचे खास आकर्षण म्हणजे पंढरपूर यात्रा, वारी, वारकरी आणि संताच्या पालख्या होय.
आषाढी एकादशी हा वारकरी बांधवांसाठी वर्षभरातील सर्वात खास दिवस आहे. मजल-दरमजल करत, विठ्ठलाचे गीत गात, फुगड्या खेळत, रींगण व विविध खेळ खेळत पंढरपूरात दाखल झालेले वारकरी १७ जुलै रोजी विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेऊन आषाढी एकादशीचा दिवस साजरा करणार आहेत. चला तर मग या मंगलमय दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देऊ.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवूनियां
तुळसी हार गळां कासे पीतांबर
आवडे निरंतर हेंचि ध्यान
मकरकुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणि विराजित
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीनें.
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
…
हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
…
सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे !
आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा
…
विठू माऊलीची कृपा
आपणा सर्वांवर कायम राहो…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
…
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत
देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
…
सण आला पंढरीचा,
सोहळा जमला आषाढी वारीचा
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
…
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
…
देव दिसे ठाई ठाई,
भक्ततीन भक्तापाई ,
सुखालाही आला या हो,
आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर,
अवघे गरजे पंढरपूर..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
…
देवशयनी एकादशीचे व्रत पापांपासून मुक्ती देऊ दे.
या जगाच्या सुखांचा उपभोग घेत असतानाच तुम्हाला स्वर्गात स्थान मिळू दे.
देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
…
जातां पंढरीसी सुख वाटे जीवा,
आनंदे केशवा भेटतांचि,
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी,
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
…
तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
आषाढी एकादशीला पंढरपूरासह राज्यभरातील मंदिरं भाविकांच्या गर्दीने फुलून जातात. या निमित्ताने अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही विठू नामाचा गजर केला जातो. काही भाविक या निमित्त एक दिवस व्रत पाळतात. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. आषाढी एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात प्रस्थान करून शेषनागावर निद्रा घेतात त्यामुळे आषाढी एकादशीस पद्मा एकादशी सुद्धा म्हटले जाते.
संबंधित बातम्या