मराठी बातम्या  /  धर्म  /  Vinayak Chaturthi : उद्या ९ जुलैला विनायक चतुर्थी; वाचा पूजा विधी, शुभ योग-मुहूर्त, महत्व आणि खास उपाय

Vinayak Chaturthi : उद्या ९ जुलैला विनायक चतुर्थी; वाचा पूजा विधी, शुभ योग-मुहूर्त, महत्व आणि खास उपाय

Jul 08, 2024 10:34 AM IST

Ashadha Vinayak Chaturthi 2024 : जुलै महिन्यातील ही चतुर्थी आषाढी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. जाणून घ्या शुभ योग-मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि खास उपाय.

आषाढ विनायक चतुर्थी २०२४
आषाढ विनायक चतुर्थी २०२४

Vinayak Chaturthi July 2024 : यावर्षी आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी मंगळवार ९ जुलै रोजी येत आहे. या दिवशी गणपती आणि चंद्र देव यांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी गणपतीची पूजा करतो, त्याच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. व्रताच्या या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिले जाते. संततीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी स्त्रिया देखील हे व्रत करतात. जाणून घेऊया आषाढी विनायक चतुर्थीची पूजा पद्धत, विधी, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, मंत्र, महत्व आणि सोपा उपाय.

विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त

आषाढ शुक्ल चतुर्थी प्रारंभ - ९ जुलै रोजी सकाळी ०६ वाजून ०८ मिनिटांनी होईल.

आषाढ शुक्ल चतुर्थी समाप्ती - १० जुलै रोजी ०७ वाजून ५१ मिनिटांनी होईल.

ट्रेंडिंग न्यूज

उदया तिथीनुसार ९ जुलै रोजी विनायक चतुर्थी साजरी केली जाईल.

पूजेचा कालावधी - पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११ वाजून ३ मिनिटे ते दुपारी १ वाजून ५० मिनिटापर्यंत आहे. पूजेचा एकूण कालावधी ०२ तास ४० मिनिटे आहे.

आषाढी विनायक चतुर्थीचे शुभ योग 

विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी रवियोग, सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे तीन शुभ योग-संयोग तयार होत आहे. विनायक चतुर्थीला रवि योग सकाळी ७ वाजून ५२ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ३१ मिनिटापर्यंत आहे. तर सर्वार्थ सिद्धी योग पहाटे ५ वाजून ३० मिनिटे ते ७ वाजून ५२ मिनिटापर्यंत आहे. आश्लेषा नक्षत्र सकाळी ७ वाजून ५२ मिनिटापर्यंत आहे. त्यानंतर मघा नक्षत्र असेल.

विनायक चतुर्थी पूजा विधी 

सकाळी लवकर उठावे. देवघर स्वच्छ करावे. देवपूजा करावी. गणपती बाप्पाला जलाभिषेक करा. श्री गणेशाला फुले, फळे अर्पण करून पिवळे चंदन लावा. मोदक किंवा लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आषाढी विनायक चतुर्थी व्रताची कथा वाचा.  ॐ गणपतये नमः या मंत्राचा जप करा. पूर्ण भक्तीभावाने गणपती बाप्पाची आरती करा. शक्य झाल्यास जवळच्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन घ्या. चंद्राला अर्घ्य अर्पण करा. शक्य असल्यास उपवास करा, यादिवशी मांसाहार करू नका. क्षमा प्रार्थना करा. 

चंद्रोदयाची वेळ

विनायक चतुर्थी, ९ जुलै रोजी असून, चंद्रोदय सकाळी ८:२५ वाजता होईल आणि चंद्रास्ताची वेळ रात्री ९:५८ वाजता असेल. या दिवशी चंद्र पाहणे निषिद्ध मानले जाते, कारण चंद्राकडे पाहिल्यास खोटा कलंक लागतो असे सांगितले जाते.

विनायक चतुर्थी उपाय

पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करावे. अर्घ्य देताना व्रत करणाऱ्या व्यक्तीने डोळे मिटून गणेशाच्या मंत्रांचा जप करावा आणि सुख-समृद्धीची कामना करावी. गणेशाच्या पूजेच्या वेळी पती-पत्नीने एकत्र बसून 'ॐ वक्रतुंडय नम:' या मंत्राचा जप केल्यास ते अत्यंत शुभ मानले जाते.

विनायक चतुर्थीचे महत्व

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाची पूजा केली जाते. याशिवाय सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपवास केला जातो. गणपती बाप्पाची आराधना केल्याने साधकाला चांगले फळ मिळते आणि जीवन आनंदाने भरलेले राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

WhatsApp channel