Significance of Mahakumbh: कुंभ...अर्ध कुंभ...पूर्ण कुंभ, महाकुंभमेळा अन् सिंहस्थ कुंभमेळ्यात काय आहे फरक, कसा येतो योग?
मराठी बातम्या  /  धर्म  /  Significance of Mahakumbh: कुंभ...अर्ध कुंभ...पूर्ण कुंभ, महाकुंभमेळा अन् सिंहस्थ कुंभमेळ्यात काय आहे फरक, कसा येतो योग?

Significance of Mahakumbh: कुंभ...अर्ध कुंभ...पूर्ण कुंभ, महाकुंभमेळा अन् सिंहस्थ कुंभमेळ्यात काय आहे फरक, कसा येतो योग?

Jan 22, 2025 03:23 PM IST

Significance Of Mahakumbh : कुंभमेळा दर १२ वर्षांनी चार पैकी एका तीर्थस्थळी आयोजित केला जातो. या स्थानांवर पवित्र नद्यांच्या संगमाला विशेष महत्व असते. प्रयागराजमध्ये गंगा,यमुना आणि सरस्वती,हरिद्वारमध्ये गंगा, उज्जैनमध्ये क्षिप्रा आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या संगमावर कुंभमेळा भरतो.

भारतात भरणाऱ्या वेगवेगळ्या कुंभमेळ्यांबाबत माहिती
भारतात भरणाऱ्या वेगवेगळ्या कुंभमेळ्यांबाबत माहिती

History of Kumbh Mela : भारताचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रतीक कुंभमेळा केवळ एक उत्सव नाही, तर भारतीय अध्यात्म, आस्था आणि परंपरेचं जिवंत उदाहरण आहे. कुंभमेळ्याचे प्रत्येक रुप मग ते अर्ध कुंभ असो, पूर्ण कुंभ असो किंवा महाकुंभ त्यांचे एक विशेष महत्व व आकर्षण असते. कुंभमेळा चार प्रमुथ तीर्थस्थळांवर भरतो. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे दर १२ वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जातो. सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा भरला आहे. या पवित्र संगमावर डुबकी मारण्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविक दररोज येत आहेत. 

कुंभमेळा दर १२ वर्षांनी चार पैकी एका तीर्थस्थळी आयोजित केला जातो. या स्थानांवर पवित्र नद्यांच्या संगमाला विशेष महत्व असते. प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती,  हरिद्वारमध्ये गंगा, उज्जैनमध्ये क्षिप्रा आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या संगमावर कुंभमेळा भरतो.

कुंभमेळ्याची पौराणिक कहाणी -

समुद्र मंथनातून जो अमृतकुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला, की जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्यांना त्रास देऊन ‘सळो की पळो’ करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृतकुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी १२ दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धाच्या दरम्यान अमृतकुंभामधून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व त्र्यंबकेश्वर येथे पडले. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले. सूर्याने अमृतकलशास फुटू दिले नाही व गुरुने राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र व गुरु कुंभ राशीत प्रवेश करतात तेव्हा कुंभमेळा भरतो. तसेच गौतम ऋषींनी त्र्यंबकला गोदावरी आणली. त्याचाही संदर्भ कुंभमेळ्याला दिला जातो.

कोठे कधी भरतो कुंभमेळा?

खगोल शास्त्रानुसार कुंभ आणि महाकुंभमेळ्याचे आयोजन अनंत काळापासून होत आले आहे. विष्णु पुराणात याचा उल्लेख आहे की, जेव्हा गुरू कुंभ राशीत प्रवेश करतो आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा हरिद्वार येथे कुंभमेळा भरतो. त्याचपद्धतीने जेव्हा सूर्य आणि गुरु सिंह राशीत असतात तेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो. उज्जैनमध्ये कुंभ भरण्याचा योग गुरु कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर होतो. प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी माघ अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र मकर राशीत असतात आणि गुरु मेष राशीत असतात. या खगोलीय गणनेचे आजही पालन केले जाते. 

अर्ध कुंभ -
अर्ध कुंभमेळा दर ६ वर्षांनी आयोजित केला जातो. हा कुंभमेळा केवळ प्रयागराज आणि हरिद्वार येथे भरतो. अर्ध कुंभमध्ये मुख्यत्वेकरून स्नानास महत्व आहे. अर्ध कुंभ एक धार्मिक आणि सांस्कृतिक आयोजन आहे. हा मेळा गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर भरतो. अर्ध कुंभमेळ्याचे महत्व यामुळे अधिक आहे की, याला कुंभमेळ्याचे अर्धे चक्र मानले जाते. यायवेळी लाखों भाविक नदी संगमात स्नान करण्यासाठी येतात. त्यांची अशी मान्यता असते की, संगमात स्नान केल्याने पापांचा नाश होतो. याच्या आयोजनाची वेळही खगोल शास्त्रावर आधारित आहे. जेव्हा गुरु वृश्चिक राशीत आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा अर्ध कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.

कुंभमेळा -  
कुंभमेळा दर १२ वर्षांनी हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नासिकमधील त्र्यंबकेश्वर यापैकी एका ठिकाणी आयोजित केला जातो. महाकुंभात लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू आणि संत-साधू सामील होत असतात. कुंभमेळा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे, जजो दर १२ वर्षांनी भरतो. याच्या आयोजनाचचे मुख्य आकर्षण पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आहे, जे अमृत स्नान म्हटले जाते. 

पूर्ण कुंभ -
पूर्ण कुंभमेळा हा कुंभमेळ्याचाच विस्तार आहे. जो दर १२ वर्षांनी प्रयागराज येथे आयोजित केला जातो. याला कुंभमेळ्याचे पूर्ण रूप मानले जाते. याचे महत्वा अन्य कुंभ मेळ्याहून अधिक आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांच्या संगमावर होणाऱ्या या आयोजनाचा मुख्य उद्देश्य आत्म्याची शुद्धी आणि मोक्ष प्राप्ती आहे.

महाकुंभमेळा -
महाकुंभ मेळा भारतीय धार्मिक आयोजनातील सर्वात मोठे पर्व आहे. महाकुंभ दर १४४ वर्षांनी म्हणजे दर १२ वर्षांनी भरणारे १२ कुंभमेळे पूर्ण झाल्यानंतर महाकुंभ भरला जातो. याचे आयोडन केवळ प्रयागराज येथे केले जाते. याला कुंभमेळ्याचे सर्वात पवित्र व महत्त्वपूर्ण रूप मानले जाते. धार्मिक ग्रंथांनुसार या मेळ्यात संगमावर स्थान केल्याने आत्मा पवित्र आणि पापांपासून मुक्ती मिळते. 

सिंहस्थ मेळा -

सिंहस्थ कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वर, नासिक येथे दर बारा वर्षांनी भरतो. जेव्हा गुरु आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात आणि अमावस्या असते तेव्हा गोदावरी त्रंबकेश्वर उगमस्थानावर नाशिक येथे हा मेळा भरतो. सूर्य, चंद्र आणि गुरु हे कुंभ राशीत प्रवेश करतात तेव्हा कुंभमेळा भरतो. जेव्हा गुरू आणि सूर्य हे सिंह राशीत प्रवेश करतात आणि अमावस्या असते,  तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वरात सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

सिंहस्थ पर्वणी

गुरु कन्या राशीत असताना ‘कन्यागत’, सिंह राशीत असताना ‘सिंहस्थ’ आणि कुंभ राशीत असताना ‘कुंभमेळा’ अशा तीन मोठ्या पर्वणी हिंदु धर्मदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जातात. तेथे गंगास्नान, साधना, दानधर्म, पितृतर्पण, श्राद्धविधी, संतदर्शन, धर्मचर्चा आदी धार्मिक कृती करण्यासाठी कोट्यवधी भाविक येतात. कुंभमेळा हा श्रद्धावानांचा मेळाच असतो.

सिंहस्थ कुंभमेळा महाराष्ट्रातील नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भरतो. हा मेळा दर बारा वर्षांनी भरतो. 

सिंहस्थ कुंभमेळा याबद्दल अधिक माहिती: 

  • सिंहस्थ कुंभमेळा हा हिंदू धर्मीयांचा मेळा आहे.
  • हा मेळा गोदावरी नदीच्या काठावर भरतो.
  • हा मेळा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात आणि अमावास्या असते तेव्हा भरतो.
  • नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा हा पारंपारिकपणे कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार मेळ्यांपैकी एक मेळा आहे.
  • या मेळ्याला नाशिक कुंभ मेळा असेही म्हणतात.
  • या मेळ्यापूर्वी चक्रतीर्थ येथे भरत होता.

 

कशी निश्चित होते तारीख -

कुंभ मेळा कोणत्या ठिकाणी आयोजित करायचा आहे, हे निश्चित करण्यासाठी ज्योतिषी आणि आखाड्यांचे प्रमुख एकत्र येतात. त्यानंतर गुरु व सूर्याच्या स्थितीचे निरीक्षण केले जाते. गुरु आणि सूर्य दोन्ही हिंदू ज्योतिष शास्त्रात प्रमुख ग्रह आहेत. यांच्या गणनेच्या आधारावर कुंभ मेळ्याचे स्थान व तारीख निश्चित केली जाते.

 

Whats_app_banner