Ananta Chaturdashi and Pradosh Vrat 2023 : सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवडा हा सणासुदीने भरलेला आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये गणेशोत्सवाची धुम असताना पितृपक्ष देखील याच आठवड्यात सुरू होणार आहे. प्रदोष व्रत आणि अनंत चतुर्दशीसाठी अनेकांनी जोरदार तयारी केलेली आहे. या दोन्ही सणांच्या दिवशी भाविक देवाची पूजा आणि आरती करत लोक कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना करत असतात. येत्या २९ सप्टेंबर पासून पितृपक्षांची सुरुवात होणार आहे. परंतु त्यापूर्वी प्रदोष व्रत आणि अनंत चतुर्दशीचा सण आला आहे. त्यामुळं चालू आठवड्यात कोणते सण असतील आणि पंचांग काय असेल?, जाणून घेवूयात.
२६ सप्टेंबर, मंगळवार- भाद्रपद शुक्ल द्वादशी, पंचक प्रारंभ ०८.२८ पासून. वामन जयंती आणि श्रवण द्वादशी
२७ सप्टेंबर, बुधवार- भाद्रपद शुक्ल त्रयोदशी, याच दिवशी प्रतोष व्रत साजरा केला जाणार.
२८ सप्टेंबर, गुरुवार- भाद्रपद शुक्ल चतुर्दशी, संध्याकाळी ०६.५० वाजेपर्यंत. अनंत चतुर्दशी व्रत आणि कदली व्रत
२९ सप्टेंबर, शुक्रवार- भाद्रपद शुक्ल पौर्णिमा, दुपारी ०३.२८ वाजेपर्यंत. पौर्णिमा आणि प्रतिपदा तिथी. पितृपक्ष प्रारंभ आणि महालय श्राद्धाची सुरुवात.
३० सप्टेंबर, शनिवार- आश्विन कृष्ण प्रतिपदा, दुपारी १२.२२ वाजेपर्यंत. आश्विन कृष्ण पक्ष प्रारंभ, द्वितीया श्राद्ध आणि पंचक समाप्ती
०१ ऑक्टोबर, रविवार- आश्विन कृष्ण द्वितीया, सकाळी ०९.४२ वाजेपर्यंत. तृतीया श्राद्ध
०२ ऑक्टोबर, सोमवार- आश्विन कृष्ण तृतीया, सकाळी ०७.३७ वाजेपर्यंत. श्रीगणेश चतुर्थी व्रत आणि भरणी श्राद्ध.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या