Anant Ambani : अनंत अंबानी यांची भक्तीयात्रा; जामनगर ते द्वारका १७० किलोमीटर अंतराची का करत आहेत पदयात्रा?
मराठी बातम्या  /  धर्म  /  Anant Ambani : अनंत अंबानी यांची भक्तीयात्रा; जामनगर ते द्वारका १७० किलोमीटर अंतराची का करत आहेत पदयात्रा?

Anant Ambani : अनंत अंबानी यांची भक्तीयात्रा; जामनगर ते द्वारका १७० किलोमीटर अंतराची का करत आहेत पदयात्रा?

Published Apr 05, 2025 05:04 PM IST

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी सध्या जामनगर ते गुजरातमधील द्वारकाधीश मंदिरापर्यंत पदयात्रा काढत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक आणि काही समर्थकही आहेत.

अनंत अंबानी यांची पदयात्रा
अनंत अंबानी यांची पदयात्रा

देशातील सर्वात मोठे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्या भक्ती आणि श्रद्धेसाठी ओळखले जाणारे अनंत अंबानी सध्या गुजरातमधील जामनगर ते द्वारकाधीश मंदिरापर्यंत पदयात्रा काढत आहेत. या पदयात्रेचा आज (५ एप्रिल) आठवा दिवस आहे. त्यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक आणि शेकडो समर्थक आणि भाविक आहेत. यावेळी ते आणि पदयात्रेत सहभागी लोक हनुमान चालीसा पठण करताना दिसले. अनंत अंबानी १० एप्रिल ला आपला वाढदिवस द्वारकेत साजरा करणार आहेत.

अनंत अंबानी म्हणाले, 'पदयात्रा आमच्या घर जामनगर ते द्वारका अशी आहे. गेल्या ८ दिवसांपासून हे सुरू असून येत्या २-४ दिवसात आम्ही पोहोचू. माझा प्रवास सुरूच आहे. भगवान द्वारकाधीश आम्हाला आशीर्वाद देवो. मी तरुणांना सांगू इच्छितो की, कोणतेही काम करण्यापूर्वी भगवान द्वारकाधीशांवर श्रद्धा ठेवा, सनातन धर्मावर श्रद्धा ठेवा आणि भगवान द्वारकाधीशांचे स्मरण करा. कोणतेही कार्य कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होईल जेव्हा देव उपस्थित असेल, त्यावेळी काळजी करण्याचे कारण नाही. "

द्वारकेत साजरा करणार वाढदिवस -

वनताराच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, अनंत अंबानी यांची भगवान श्री द्वारकाधीशवर अगाध श्रद्धा आहे. त्यांनी २८ मार्च २०२५ रोजी 'जय द्वारकाधीश'च्या जयघोषाने जामनगरमधील रिलायन्स इंडस्ट्रीज टाऊनशिप ते भगवान श्रीकृष्णाची नगरी द्वारका अशी १७० किलोमीटर लांबीची पदयात्रा सुरू केली आहे. १० एप्रिल २०२५ रोजी त्यांचा वाढदिवस द्वारका येथे साजरा होणार आहे.

रात्रीच्या वेळी करत आहेत पदयात्रा -

अनंत अंबानी यांच्यासोबत त्यांची सुरक्षा टीम आणि सहकाऱ्यांचा मोठा ताफा आहे. पदयात्रेमुळे वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून ते रात्री उशिरा प्रवास करत आहेत. दररोज ते सुमारे १० ते १२ किलोमीटरचे अंतर कापत आहे. १० एप्रिल रोजी ते द्वारकेत पोहोचतील आणि भगवान द्वारकाधीशांच्या दर्शनाने आपला वाढदिवस साजरा करतील. अनंत अंबानी यांच्या मित्रांशिवाय शेकडो ब्राह्मण आणि भाविकही या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. यात्रेदरम्यान भाविकांनी जय द्वारकाधीश चा जयघोष करत भजन व कीर्तन केले. यावेळी अनंत अंबानी यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पदयात्रा मार्गावर स्थानिक लोकही मोठ्या संख्येने जमत आहेत. या पदयात्रेदरम्यान ते हनुमान चालिसा, रामायणातील सुंदरकांड आणि देवी स्तोत्र यांचे पठण करत असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

अंबानी कुटुंबाची द्वारकाधीशांवर श्रद्धा -

अंबानी कुटुंबाची भगवान द्वारकाधीशवर अगाध श्रद्धा आहे. द्वारका आणि सोमनाथ मंदिरांना ते नियमित भेट देतात. अलीकडेच अंबानी कुटुंबाने महाकुंभात स्नान ही केले होते.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner