कार्तीक अमावस्या 2024 : हिंदू धर्मात कार्तीक अमावस्या खूप महत्वाची मानली जाते. यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात येणारी अमावस्या कार्तीक, मार्गशीर्ष अमावस्या म्हणून ओळखली जाईल. कार्तीक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. या दिवशी केलेली पूजा आणि उपवास विशेष फलदायी मानला जातो. जाणून घेऊया अमावस्या कधी आहे? अमावस्येचा शुभमुहूर्त, पूजा-पद्धत, उपाय आणि महत्त्व-
हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तीक महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या शनिवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजून २९ मिनिटांनी सुरू होईल. तर अमावस्या तिथी १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी संपणार आहे. अशा तऱ्हेने उदया तिथीनुसार कार्तीक अमावस्येचे व्रत रविवार १ डिसेंबर रोजी केले जाणार आहे.
सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य केल्यानंतर मंदिर स्वच्छ करा आणि मनोभावे देवपूजा करा. गणेशाला वंदन करा. विष्णूला पंचामृताने गंगेच्या पाण्याने अभिषेक करा. आता भगवंताला पिवळे चंदन व पिवळी फुले अर्पण करा. मंदिरात तुपाचा दिवा लावा. श्री विष्णू चालीसा पठण करा. विष्णूची आरती पूर्ण भक्तीभावाने करा. तुळशीचे पान ठेऊन नैवेद्य अर्पण करा. शेवटी क्षमा प्रार्थना करा.
मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी दान आणि स्नानाला विशेष महत्त्व मानले जाते. मार्गशीर्ष ाच्या अमावस्येला दान केल्यास पितृदोषाचे दुष्परिणाम कमी होऊ शकतात. याशिवाय मार्गशीर्ष अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. त्याचबरोबर या दिवशी गायी, कावळे आणि कुत्र्यांना खाऊ घातल्यास जीवनातील त्रास दूर होऊ शकतात.
ऊँ श्री कृष्णाय नम:
ऊँ श्री श्रीरघुनाथाय नम:
ऊँ श्री दामोदराय नम:
ऊँ श्रीजनार्दनाय नम:
अमावस्येच्या दिवशी पितरांचे ध्यान करताना पिंपळाच्या झाडाला गंगाजल, काळे तीळ, साखर, तांदूळ, पाणी आणि फुले अर्पण करा आणि 'ॐ पितृभ्यै नमः' या मंत्राचा जप करा. या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठण केल्यास शुभ फल प्राप्त होते.
डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.