Akshaya Tritiya Wishes In Marathi : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व मानले जाते. हा दिवस दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. यावर्षी अक्षय्य तृतीयेचा सण बुधवार, ३० एप्रिल रोजी म्हणजेच आज साजरा केला जात आहे. असे मानले जाते की या दिवशी कुबेर महाराज, देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी एखादे चांगले काम सुरू केल्याने त्याचे फळ कधीच संपत नाही. अशा तऱ्हेने जर तुम्हालाही हा शुभ दिवस आपल्या मित्रपरिवारासाठी खास बनवायचा असेल तर तुम्ही त्यांना अक्षय तृतीयेशी संबंधित या टॉप 10 शुभेच्छा पाठवू शकता.
१. तुमचे जीवन सोन्यासारखे चमकावे, तुमचे हास्य चांदीसारखे चमकावे,
अक्षय्य तृतीया असंख्य आनंद घेऊन येवो आणि प्रत्येक दिवस एखाद्या सणासारखा असावा!
अक्षय तृतीया २०२५ च्या हार्दिक शुभेच्छा
2-यश पायाशी घोळू दे,
सर्व खुशी आसपास भटकू दे,
धनाची वृद्धी होऊ दे,
प्रियजनांचे प्रेम लाभू दे,
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
3-दिवसेंदिवस व्यापार वाढू दे,
कुटूंबात अतुट प्रेम राहू दे,
धनाने झोळी भरू दे पैशाचा पाऊस पडू दे,
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
४. ही अक्षय्य तृतीया तुमच्या आयुष्यातील यशस्वी प्रवासाची सुरुवात होवो, तुमची स्वप्ने पूर्ण होवोत आणि जीवनात संपत्तीचा खजिना होवो,
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
५. तिजोरी धनाने परिपूर्ण असावी, सुख अपार असावे,
दु:ख नेहमी दूर असावे, सुख अफाट असावे.
अक्षय तृतीया २०२५ च्या हार्दिक शुभेच्छा
6-देवी लक्ष्मी या दिवशी तुम्हाला शुभतेचा आशीर्वाद देवो, हा दिवस जीवनात समृद्धी घेऊन येवो आणि आनंदाचा पाऊस पडो,
तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा.
7-तुमचे प्रत्येक काम पूर्ण होऊ दे,
कोणतेच स्वप्न पूर्ण राहू नये,
तुमच्या आनंदाला कोणाची नजर लागू नये,
जीवनात नेहमी यश मिळवत राहा,
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.
8- अक्षय्य राहो सुख आपले अक्षय्य राहो नाते आपले अक्षय्य राहो प्रेम आपले आपणांस आणि आपल्या परिवारास अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!
9 - सोन्याच्या झळाळीप्रमाणे उजळून जावो आयुष्य तुमचे,
सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी हेच मागणे ईश्वराकडे आमचे...
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
10 -साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया या सणाच्या निमित्ताने सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच प्रार्थना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !
संबंधित बातम्या