do not buy these things on akshaya tritiya : अक्षय्य तृतीयेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. दिवाळीप्रमाणेच हा सणालाही खूप महत्व आहे. हा दिवस देवी लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूच्या पूजेला समर्पित आहे. यावेळी अक्षय्य तृतीयेचा सण १० मे २०२४ रोजी साजरा केला जाणार आहे.
असे म्हटले जाते की जे लोक या तिथीला खऱ्या भक्ती भावाने धनदेवतेची पूजा करतात, त्यांचे धन आणि सौभाग्य वाढते, चला तर मग जाणून घेऊया या दिवसाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.
ज्योतिषांच्या मते, यावर्षी अक्षय्य तृतीया १० मे रोजी आहे. या दिवशी, शुभ मुहूर्त सकाळी ०४:१७ वाजता सुरू होईल आणि ११ मे रोजी पहाटे ०२:५० वाजता समाप्त होईल. त्यामुळे यंदा १० मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे.
या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ०५:३३ ते दुपारी १२:१८ पर्यंत आहे. या काळात तुम्ही संपत्तीची देवी लक्ष्मीची प्रार्थना करू शकता आणि सुख, समृद्धी आणि संपत्तीत वाढ करण्याची कामना करू शकता. या काळात केलेली सर्व कामे यशस्वी होतात, असे मानले जाते. तसेच संपत्ती वाढते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू, स्टीलची ॲल्युमिनियमची भांडी, काळे कपडे, धारदार वस्तू, काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नयेत, असे सांगितले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने घरात दारिद्र्य येते असे म्हटले जाते.
याशिवाय घरामध्ये ग्रह आणि वास्तु दोष राहतात. अशा वेळी या शुभ मुहूर्तावर चुकूनही या वस्तू खरेदी करू नका. अन्यथा तुम्हाला दुर्दैवाला सामोरे जावे लागू शकते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े
संबंधित बातम्या