अक्षय्य तृतीयेचा दिवस म्हणजेच आजचा (१० मे) प्रामुख्याने माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांच्या पूजेला समर्पित मानला जातो. या दिवशी संध्याकाळी काही ठिकाणी दिवे लावण्याचीही परंपरा आहे. अशा स्थितीत अक्षय्य तृतीयेच्या रात्री काही विशिष्ठ ठिकाणी दिवे लावल्यास लक्ष्मी आणि कुबेर देवाची कृपा प्राप्त होते, असे केल्याने धनाची कमतरता भासणार नाही आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.
शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरात दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. अशा स्थितीत या दिवशी घराच्या छतावर दिवा अवश्य लावा. असे केल्याने तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहते.
अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी दिवा उत्तर दिशेला लावावा, कारण ही दिशा भगवान कुबेर आणि धनाची देवी लक्ष्मीची दिशा मानली जाते. अशा स्थितीत या दिशेला दिवा लावल्याने सुख-समृद्धी मिळू शकते.
अक्षय्य तृतीयेच्या रात्री मुख्य दरवाजावरदेखील दिवा लावावा, कारण देवी लक्ष्मीचे आगमन मुख्य दरवाजातूनच होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही येथे रांगोळी देखील काढू शकता. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती तुमच्या घरात प्रवेश करते.
तुळशी मातेला हिंदू धर्मात लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशा स्थितीत अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. यामुळे लक्ष्मी देवीचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो. संपत्ती आणि समृद्धी मिळविण्यासाठी, तुम्ही तिजोरीजवळ किंवा पैसा ठेवलेल्या ठिकाणी दिवा लावू शकता.
लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या आशीर्वादासाठी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराजवळील मंदिरात दिवा लावू शकता. यासोबतच तुमच्या आजूबाजूला एखादी विहीर किंवा इतर जलस्त्रोत उपलब्ध असल्यास अक्षय्य तृतीयेच्या रात्री त्याजवळ दिवा लावावा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े