Ajmer Khwaja Garib Nawaz: अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यावर चादर का चढवतात? काय आहे कारण?
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ajmer Khwaja Garib Nawaz: अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यावर चादर का चढवतात? काय आहे कारण?

Ajmer Khwaja Garib Nawaz: अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यावर चादर का चढवतात? काय आहे कारण?

Jan 08, 2025 06:11 PM IST

Ajmer Khwaja Garib Nawaz: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर चढवण्यासाठी चादर पाठवली. दर्ग्यावर चादर चढवण्याची परंपरा कशी सुरू झाली? चादर चढवण्याचे कारण काय, हे जाणून घेऊ या.

अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यावर चादर का चढवतात? काय आहे कारण?
अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यावर चादर का चढवतात? काय आहे कारण?

Ajmer Khwaja Garib Nawaz: राजस्थानातील अजमेर येथे प्रसिद्ध ख्वाजा गरीब नवाज यांचा दर्गा शरीफ आहे. येथे ८१३ वा उर्स सुरू झाला आहे. हा उर्स इस्लामिक दिनदर्शिकेतील सातवा महिना रजबमध्ये साजरा केला जातो.

र्ग्यावर चढवली जाते चादर

अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्गा शरीफ येथे केवळ देशातीलच नाही, तर परदेशातून देखील लोक येत असतात. येथे आल्यानंतर दर्ग्यावर मोठ्या श्रद्धेने चादर चढवली जाते. हे कार्य अत्यंत पवित्र मानले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवली चादर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती (Khwaja Moin-ud-din Chishty) यांच्या ८१३ व्या उर्सच्या निमित्ताने त्यांच्या अजमेर येथील दर्गा शरीफसाठी चादर पाठवली आहे.

अजमेर शरीफ येथील हा दर्ग्यात सुप्रसिद्ध सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांची समाधी आहे. असे नाही की फक्त उर्स भरलेला असतानाच इथे चादर चढवली जाते, तर सुफी संत चिश्ती यांच्या समाधीवर दररोज मोठ्या श्रद्धेने चादर चढवली जाते.

का चढवली जाते चादर?

सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांच्या समाधीवर का चढवली जाते चादर, असा प्रश्न अनेकांना पडतो. चादर चढवण्याची ही पद्धत ८०० वर्षे जुनी आहे. सुरुवातीच्या काळात हा दर्गा शरीफ कच्च्या स्वरुपात होता. तर सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांची समाधी उघडीच होती. अशा वेळी समाधीवर धूळ किंवा घाण पडू नये यासाठी कपड्याची चादर चढवून समाझी झाकली जात असे. कालांतराने दर्गा आणि समाधी पक्की बनवली गेली. मात्र धूळ आणि घाण बसू नये यासाठी सुरू केलेली चादर चढवण्याची पद्धत नंतर परंपरा बनली.

अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यावर चादर का चढवतात? काय आहे कारण?
अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यावर चादर का चढवतात? काय आहे कारण?

कोण होते ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती?

ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती हे एक सुप्रसिद्ध सुफी संत आहेत. त्यांचा जन्म इराणमधील सजिस्तान शहरात झाला होता. ते ११९२ मध्ये भारतात आले. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती एक सुन्नी मुस्लिम तत्वज्ञानी, विद्वान आणि संत होते. त्यांना सुलतान-ए-हिंद आणि गरीब नवाज या नावांनी ओळखले जाते. अजमेर येथील त्यांचा दर्गा शरीफ इंडो-इस्लामिक व वास्तुकलेचा अद्भुत नमुना मानला जातो.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner