Ahilyabai Holkar Jayanti Wishes : राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन संदेश, स्टेटस ठेवा व पोस्ट करा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ahilyabai Holkar Jayanti Wishes : राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन संदेश, स्टेटस ठेवा व पोस्ट करा

Ahilyabai Holkar Jayanti Wishes : राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन संदेश, स्टेटस ठेवा व पोस्ट करा

May 29, 2024 07:32 PM IST

Ahilyabai Holkar Jayanti 2024 Wishes : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३१ मे रोजी जंयंती साजरी होईल. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त समाजमाध्यमातून अभिवादन करण्यासाठी या संदेशांचा उपयोग होईल. स्टेटस ठेवा आणि पोस्ट करा.

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन संदेश व शुभेच्छा
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन संदेश व शुभेच्छा

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात झाला. वयाच्या ८व्या वर्षी मल्हारराव होळकर यांच्या मुलासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांनी त्यांच्या जीवनाला वळण दिले.

अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केले. त्यांनी महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिक्षणासाठी केंद्रे स्थापन केली, त्यांच्या विविध क्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन दिले, विधवांची स्थिती सुधारण्यात मदत केली, धार्मिक सहिष्णुता वाढवण्यात योगदान दिले आणि विविध समुदायांमध्ये एकोपा वाढवणे हा नेहमीच त्यांचा प्रयत्न होता.

अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. अहिल्याबाई होळकर यांचे समाजातील योगदान आणि त्यांचे पुरोगामी शासन आजही लोकांना प्रेरणा देत आहे. अहिल्याबाईंच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतीला वंदन करूया आणि या कर्तबगार स्त्री बाबत समाजमाध्यमातून काही खास अभिवादन शुभेच्छा संदेश देऊया.

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन संदेश व शुभेच्छा

घाट, मंदिरे विहिरी बांधल्या,

समान तिला रंक नि राव,

लोकांसाठी देह झिजवि,

अहिल्याबाई होळकर तिचे नाव।

अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले ,ही वीर रणरागिनी झाली।

ही गोरगरिबांची मायमाऊली ,थोर अहिल्या जन्मा आली।

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

घडविले जे जे आपण, करावे त्याचे रक्षण,

बाणेदारपणे उत्तर देणाऱ्या, अहिल्याबाई ना त्रिवार वंदन

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप अभिवादन

लोककल्याणकारी राणी अहिल्या, राज्यकारभारात तरबेज होत्या,

दीन-दुबळ्यांसाठी आईसमान, तत्वज्ञानी अन् कुशल संघटक होत्या.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

मधुर होती जिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा-दाही,

तिच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही. सुखात नांदली आमची जनता,

कारण उत्तम शासन, तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता,

त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

इंग्रजांनाही दाद न देण्याची

जिद्दच त्यांची न्यारी होती,

राणी असूनही वेगळी जिची छाप होती,

अशी राणी अहिल्याबाई होती!!

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा

आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले. १३ ऑगस्ट १७९५ रोजी अहिल्याबाई होळकर या अनंतात विलीन झाल्या. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला.

Whats_app_banner