Vastu Shastra Tips In Marathi: वैदिक शास्त्रात राशीभविष्य, अंकभविष्य, रत्नशास्त्र याप्रमाणेच वास्तूशास्त्रालासुद्धा प्रचंड महत्व आहे. शास्त्रानुसार एखादी वास्तू खरेदी करताना अथवा बांधताना वास्तू शास्त्राचा आधार घेतल्यास कोणतीही वास्तू सुखसमृद्धीने बहरुन जाते. याउलट एखाद्या वास्तूमध्ये दोष असेल तर ती वास्तू तुमच्या यशामध्ये बाधा घालू शकते.
अशा परिस्थितीत घर बांधताना किंवा घरात वस्तू ठेवताना योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण चुकीच्या वास्तुनुसार चुकीच्या दिशेला गोष्टी ठेवल्या तर कितीही कष्ट केले तरीही घरात गरीबी आणि अपयशच येते. शास्त्रानुसार अशा घरात कधीच प्रगती होणार नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्योतिषीय अभ्यासानुसार आणि वास्तू शास्त्रानुसार घराची तिजोरी कोणत्या दिशेला ठेवणे उत्तम मानले जाते. असे केल्याने तुमच्या घरात पैसा तर टिकेलच शिवाय प्रत्येक कामात यशसुद्धा मिळेल.
बहुतांश लोक घरामध्ये सुखसमृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तू शास्त्राचा आधार घेतात. अनेकांना वास्तू शास्त्राचा विशेष लाभ झालेला पाहायला मिळतो. आज आपण वास्तू शास्त्रासंबंधी असेच काही नियम पाहणार आहोत. वास्तू शास्त्रानुसार आपल्या घरात असलेली तिजोरी नेहमी दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी असावी. किंवा फक्त पश्चिम दिशाही तिजोरीसाठी उत्तम असते. वास्तुशास्त्रानुसार या दिशेच्या स्थानावर पैशांची खास बचत होत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच या ठिकाणी तिजोरी ठेवल्यास अनावश्यकी किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे खर्च होत नाहीत. त्याऐवजी, पैशांमध्ये सतत भर पडत राहते.
वास्तूशास्त्रानुसार ही दिशा धन आकर्षित करण्यात सर्वात शुभ असते. या दिशेला तिजोरी ठेवून तुम्ही कोणतीही आर्थिक गुंतवणूक केल्यास त्यातून फायदाच फायदा होईल. तसेच पैशांचा अनावश्यक वापर होणे कमी होते. ही दिशा धन आकर्षित करत असल्याने घरात कधीही आर्थिक समस्या किंवा गरिबीसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. त्यामुळे घरातील तिजोरी नेहमी नैऋत्य दिशेला ठेवावी.
वास्तूशास्त्रानुसार, आपल्या घरातील तिजोरीत कपडे, भांडी, फाइल्स याप्रकारच्या वस्तू अजिबात ठेवू नयेत. तसेच तिजोरीच्या अगदी समोर देवतांचे कोणतेही फोटो लावू नये. शिवाय पैशांवर कोणतीही जड वस्तू ठेऊन त्यावर भार पडू देऊ नका. तिजोरीत मध्यभागी किंवा वरच्या भागात पैसे ठेवावे. याशिवाय एखादे परफ्युम, अगरबत्ती इत्यादी सुगंधित वस्तू तिजोरीत ठेवणे आवर्जून टाळावे. या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तिजोरीत पैसा टिकेल शिवाय नवीन धन आकर्षित होईल.
संबंधित बातम्या